उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात भाजपच्या कार्यक्रमानिमित्त आले होते, यावेळी भाषणात त्यांनी शरद पवारांच्या आत्मचरित्रातील उताऱ्याचा आधार घेत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. तसेच शरद पवार यांनी जे लिहीले तेच आम्ही म्हणत होतो, असे सांगत पवारांनी जे लिहीले त्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार मानतो म्हणत ठाकरेंवर सडकून टीका केली.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज पुण्यात भाजप राज्य कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी कर्नाटक निवडणुकीचा महाराष्ट्रात कोणताही परिनाम होणार नाही असे सांगत भाजप पुन्हा सत्तेवर येईल असा दावा देखील त्यांनी यावेळी केला. यावेळी फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. ठाकरेंवर टीका करताना त्यांनी शरद पवार यांच्या ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकातील उद्धव ठाकरेंबद्दल पवारांनी लिहिलेला एक उताराच त्यांनी वाचून दाखवला.
यावेळी फडणवीस यांनी शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती पुस्तकाचा उल्लेख करत पुस्तकातील पान क्रमांक सांगत त्यावरील उद्धव ठाकरेंबाबत जे लिहीले आहे त्यातील 10 वाक्ये सांगतो असे म्हणत त्यांनी उताऱ्याचे वाचन केले. हिंदूह्रदयस्रम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतीची संवादाची सहजता, उद्धव ठाकरे यांच्यासोबत नव्हती. ठाकरेंना राज्यातील घडामोडींची बित्तंबातमी नसे, जी एका मुख्यमंत्र्यांकडे असायला हवी होती. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत उद्रेक होईल, याची कल्पनाच आम्हाला आली नव्हती. त्यांचं कुठे काय घडतंय, याकडे लक्ष नसे. उद्या काय होईल, याचा अंदाज असायला हवे, ही क्षमता त्यांच्याकडे नव्हती. त्यानुसार काय पावलं उचलायची, याची राजकीय चातुर्य असायला हवं, आम्हाला जाणवत होती. ठाकरेंना अनुभव नसल्याने हे सगळं त्यांना जमत नव्हंत, काही गोष्टी त्यांना टाळचा येणं जमलं नाही. महाविकास आघाडी सरकार कोसळताना पहिल्याच टप्प्यात त्यांनी संघर्ष न करताच माघार घेतली. ठाकरे प्रशासनाच्या संपर्कात होते, पण ऑनलाईन. टोपे, अजितदादा इतर मंत्री प्रत्यक्ष संपर्कात होते. ठाकरेंचे फक्त दोन वेळा मंत्रालयात जाणे, हे आमच्या पचनी पडणारे नव्हते.
हे सुद्धा वाचा
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या शपथ घेणार; 2024 च्या लोकसभा निवडणुकीची रणनिती
आता बैलगाडा शर्यतींचा धुरळा; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा
अंधश्रद्धेचं भूत..करणी केल्याच्या संशयावरून शेजाऱ्याला संपवलं
शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या राजकीय आत्मचरित्रातील उतारा वाचून दाखवित ही दहा वाक्ये मी म्हटली आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्यावंतर ते म्हणाले, शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जे म्हटले आहे तेच आम्ही म्हणत होतो. त्यावेळी ते आम्हाला महाराष्ट्र द्रोही म्हणत होते. मात्र शरद पवार यांनी ठाकरेंबद्दल ही दहा वाक्ये बोलल्याबद्दल त्यांचे कोटी कोटी आभार, असे म्हणत फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली.