29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयNagpur Airport : VIP कल्चर बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांचा असाही साधेपणा!

Nagpur Airport : VIP कल्चर बाजूला सारत देवेंद्र फडणवीसांचा असाही साधेपणा!

मंत्री, खासदार आमदार म्हटले की, तामझाम, सेक्युरीटी, कार्यकर्त्यांचा गराडा हे नेहमीचे चित्र आपल्याला पहायला मिळते, त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड सिक्युरीटी असताना देखील ते रांगेत उभे असलेले पहायला मिळाले आणि तेथे असणाऱ्या अनेकांना फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरता आला नाही.

मंत्री, खासदार आमदार म्हटले की, तामझाम, सेक्युरीटी, कार्यकर्त्यांचा गराडा हे नेहमीचे चित्र आपल्याला पहायला मिळते, त्यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड सिक्युरीटी असताना देखील ते रांगेत उभे असलेले पहायला मिळाले आणि तेथे असणाऱ्या अनेकांना फोटो, व्हिडीओ काढण्याचा मोह आवरता आला नाही.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर आले असता, त्यांनी कोणताही तामझाम न दाखवता बोर्डिंग पास घेण्यासाठी ते रांगेत उभे राहीले. यावेळी त्यांच्या पुढे मोठी रांग लागलेली असताना देखील त्यांना रांगेत उभे असल्याचे पाहून विमानतळावरील लोकांच्या नजरा त्यांच्यावर वळल्या. देवेंद्र फडणवीस हे सध्या राज्याच्या राजकारणातील एक प्रभावी नेते आहेत. त्यांना VIP सुरक्षा आहे, त्यामुळे विमानतळावर त्यांना अगदी सहजपणे बोर्डिंग पास मिळाला असता. मात्र त्यांनी ते टाळत बोर्डिंगपाससाठी रांगेत उभे राहीले.

आपण लोकसेवक असल्याचे फडणवीस अनेकदान म्हणतात, नेतेपद, मंत्रीपद याबाबतीत ते त्यांच्या कामातून आपली ओळख दाखवून देत असले तरी सार्वजिक ठिकाणी वावरताना मात्र त्यांच्यातील साधेपणाचे अनेकदा दर्शन घडून आलेले आहे. आज विमानतळावर देखील अनेकांना त्याचा अनूभव आला. विमानतळावर ते रांगेत उभे असताना अनेकांनी त्याचा व्हिडीओ काढून समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) व्हायरल केला.

अनेकदा देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यास येणाऱ्या कार्यकर्ते, नागरिक, पक्षातील पदाधिकारी यांच्यासोबत देखील ते अतिशय साधेपणाने भेटत असतात. तसेच आपला वाढदिवसासाठी देखील ते साधेपणाने साजरा करतात. अनेकदा कार्यकर्त्यांना देखील सत्कार, हार तूरे टाळण्याचे आवाहन ते करतात. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदी असताना देखील अनेकदा त्यांच्यातील साधेपणा पहायला मिळाला, २०१८ साली पावसाळी अधिवेनासाच्या बंदोबस्ताला राज्यभरातून नागपूरात पोलिसांची कुमूक आली होती. त्यावेळी फडणवीस पोलिसांची आस्थेवाईकपणे चौकशी केली होती. तसेच त्यांच्यासोबत रांगेत उभे राहून त्यांनी जेवण केले होते. मुख्यमंत्री जेवणासाठी आपल्यासोबत रांगेत उभे राहिल्याचे पाहून त्यावेळी पोलीस देखील भारावून गेले होते.
हे सुद्धा वाचा :

BCCI : आता महिला खेळाडूंनाही मिळणार विराट कोहली इतकाच पगार! जय शहा यांची घोषणा

Aaditya Thackeray : उद्धव ठाकरेंनंतर आदित्य ठाकरे बळीराजाच्या भेटीला

Arvind Kejriwal vs BJP : नोटांवरील फोटो बदलण्याच्या केजरीवालांच्या मागणीला भाजपचे सडेतोड उत्तर

साधेपणा, पण शिस्तप्रिय नेता
देवेंद्र फडणवीस यांच्यातील साधेपणा जसा अनेकदा पहायला मिळतो तसा त्यांच्या शिस्तीचा देखील प्रत्यय अनेकांना येतो. पक्षात कार्यकर्ते असोत पदाधिकारी असोत की प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी त्यांच्या कामातील शिस्तीबाबत ते नेहमी आग्रही असल्याचे देखील दिसून येते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी