28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयदेवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही...

देवेंद्र फडणवीसांचे माईक प्रेम आणि बरेच काही…

टीम लय भारी

मुंबई : राज्यात शिंदे – फडणविसांचे नव्याने युती सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली खरी परंतु अद्याप दोन डोक्यांचे सरकार नेमकं हाकतंय कोण असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. दरम्यान, दरवेळी मुख्यमंत्री शिंदे बोलताना मध्येच काहीतरी व्यत्यय आणणारे देवेंद्र फडणवीस आता चांगलेत चर्चेत आले आहेत. टीकेचे धनी झालेले देवेंद्र फडणवीस यांनी आपण  माईक का हिसकाऊन घेतला याचे आता स्पष्टीकरण दिले आहे.

नवे सरकार स्थापन झाल्यापासून फडणवीस आणि शिंदे मंत्रीमंडळासंदर्भातील बैठका, पत्रकार परिषदा नित्यनियमाने घेत आहेत, त्यातील अशीच एक पत्रकार परिषद वादग्रस्त ठरली आहे. मध्यंतरी पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्या पुढ्यातील माईक सरकवून आपल्याकडे ओढून घेतला, त्यामुळे पत्रकारांशी संवाद साधणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पुरती पंचाईत झाली, तर पत्रकारांमध्ये चर्चेचा विषय ठरला.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालू लागला आणि नेटकऱ्यांसाठी फडणवीस टीकेचा विषय बनले. दरम्यान, यावर स्पष्टीकरण देताना माध्यमांनाच दोष देत नेहमीप्रमाणे दिशाभूल करणारा त्यांनी युक्तिवाद केला. यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मी माईक माझ्याकडे घेतला कारण प्रश्न करणाऱ्याने तो प्रश्न मला विचारला होता.

परंतु, मुख्यमंत्री बोलत असताना जरी प्रश्न फडणवीस यांना विचारला असला तरी माईक अशा पद्धतीने ओढून घेण्याची परंपरा आणि पद्धत आपल्याकडे नाही, त्यामुळे सदर युक्तीवाद अत्यंत लंगडा असल्याची प्रतिक्रिया जनमानसांतून उमटत आहे.

अत्यंत हुशार म्हणून लोकप्रिय असणारे देवेंद्र फडणवीस हे यावेळी विसरले की असाच एक प्रसंग पुर्वीसुद्धा घडून गेलेला आहे. काही महिन्यांपूर्वी एका पत्रकाराने भाजपच्या पत्रकार परिषदेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना प्रश्न विचारला आणि त्यावर त्यांनी उत्तर द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर फडणवीस यांनी ‘ही माझी पत्रकार परिषद आहे, त्यामुळे उत्तर मीच देणार,’ असा बाणा पत्करत काहीसे अरेरावीचे उत्तर माध्यमांना दिले होते.

दरम्यान आता सुद्धा देवेंद्र फडणीस खुद्द मुख्यमंत्री यांच्या समोरील माईक हिसकावत आहेत त्यामुळे या पार्श्वभूमीवर फडणवीस यांचा युक्तीवाद किती फसवा आणि चुकीचा आहे हे सिद्ध झाले आहे.

समाजमाध्यमांतून बोट ठेवलेली राजकीय वर्तुळातील ही नवी पद्धत सामान्य जनतेला पचणारी आहे का, देवेंद्र फडणवीसांचे उत्तर समाधानकारक आहे का असे एक ना अनेक प्रश्न जनतेत पुन्हा पुन्हा पेच निर्माण करू लागले आहेत.

हे सुद्धा वाचा…

बंडखोर मुख्यमंत्री आणि त्यांचे फुटीर आमदार महाराष्ट्राचे तुकडे करण्याच्या कुटील कारस्थानाचे ईडीपिडीत पाईक, संजय भोसलेंचा थेट आरोप

प्रा. हरि नरके यांची ‘ही‘ गोष्ट…. नक्कीच वाचा

ऐन पावसाळ्यात पुण्यात आगडोंब, 12 घरे संपुर्ण जळून खाक

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी