26 C
Mumbai
Sunday, September 17, 2023
घरराजकीयअमली पदार्थ गैरव्यवहारात सहभागी अधिकारी बडतर्फ केला जाईल - गृहमंत्री फडणवीस

अमली पदार्थ गैरव्यवहारात सहभागी अधिकारी बडतर्फ केला जाईल – गृहमंत्री फडणवीस

अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल. त्याचबरोबर प्रशासनातील जे अधिकारी या अवैध कामधंद्यामध्ये सहभागी असतील त्यांना बडतर्फ केलं जाईल, असे आश्वासन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
अमली पदार्थांची तस्करी व विक्री रोखण्याबाबत सरकारने काय पाय उचलले, असा सवाल राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आज विधान सभेत लक्षवेधीद्वारे उपस्थित केला. त्यावर गृहमंत्री फडणवीस यांनी सभागृहात माहिती दिली. झोपटपट्टी विभागात अंमली पदार्थ सेवनाचे प्रमाण अधिक आहे त्यामुळे सरकारने या भागातील पोलिसांची गस्त वाढवायला पाहिजे असं मत अबू आझमी यांनी व्यक्त केलं.

अंमलीपदार्थ विरोधी पथकामध्ये मनुष्यबळ कमी आहे त्यासाठी भरती करणार का? आणि इन्फ्रास्ट्रक्चर नाही त्यासाठी काही वेगळे धोरणे राबवणार का? असे प्रश्न रोहित पवारांनी उपस्थित केले. यावर उत्तर देताना, या विभागासाठी १८ हजार जणांची भरती काढली आहे त्यामुळे मनुष्यबळाची कमी पडणार नाही.” असं फडणवीस म्हणाले.

अंमली पदार्थांच्या किंमती अमर्याद वाढल्या असून अनेक तरूण याच्या आहारी गेले आहेत. जोपर्यंत पोलीस यंत्रणा सतर्क होत नाही तोपर्यंत यावर आळा बसणार नाही. या अवैध धंद्याच्या बाबतीत पोलिसांना सगळी माहिती असते. पण त्यांना अमर्याद अधिकार दिले तर हे बंद होऊ शकते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले आहे. पानवाल्याची दुकाने बंद करा, असे ड्रग्ज विकण्यासाठी पानवाला हा प्रमुख स्त्रोत आहे, त्यामुळे पानवाल्यांची दुकाने रात्री ११ वाजता बंद करावेत अशी मागणी जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे.

 हे सुदधा वाचा
अजित पवारांचा वाढदिवस राज्यात ‘अजित उत्सव’ म्हणून साजरा करणार : सुनील तटकरे

राज्यात सरकारी खात्यातील अडीच लाख पदे रिक्त

अखेर ठरलं! 2024 च्या निवडणुकीसाठी विरोधी युतीचे नाव INDIA,जाणून घ्या याचा अर्थ

त्यावर, अंमली पदार्थ तस्करी आणि अवैध कामांविरोधात कारवाई केली जाईल असं उत्तर फडणवीस यांनी दिले. त्याचबरोबर प्रशासनातील जे अधिकारी या अवैध कामधंद्यामध्ये सहभागी असतील त्यांना बडतर्फ केलं जाईल असंही ते म्हणाले.

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी