लोकसभा निवडणुकीचा निकाल मंगळवारी लागला. भाजपाने एनडीएसह ४०० जागा देशभरात जिंकण्याचा दावा केला होता. भाजपाला देशभरात २४० जागा मिळाल्या आहेत. तर महाराष्ट्रात फक्त ९ जागांवर यश मिळालं आहे. या निकालांची नैतिक जबाबदारी स्वीकारत देवेंद्र फडणवीस ((Devendra Fadnavis) यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. मात्र एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी मी चर्चा करेन असं म्हटलंय. निवडणुकीत हार-जित होत असते असंही म्हटलं आहे. तर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.(Devendra Fadnavis should not even think of resigning; Chhagan Bhujbal )
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात अपेक्षित यश न मिळाल्याचं मान्य केलं आहे. तसेच, या पराभवाची संपूर्ण जबाबदारी आपली असल्याचं ते म्हणाले आहेत. “कितीही गणितं मांडली तरी आमच्या जागा कमी आल्या आहेत हे वास्तव मान्य करावं लागेल. या निवडणुकीचं नेतृत्व भाजपाकडून मी करत होतो. त्यामुळे ज्या काही जागा कमी आल्या असतील, त्याची जबाबदारी माझी आहे. मी मान्य करतो की मी स्वत: यात कमी पडलो आहे. ती कमतरता भरून काढण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत”, असं देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले.
“भाजपाला महाराष्ट्रात ज्या परिस्थितीचा सामना करावा लागलेल्या त्या सगळ्या स्थितीची सगळी जबाबदारी मी स्वीकारतो आहे. आता मला विधानसभेत पूर्णवेळ उतरायचं आहे. त्यामुळे मी भाजपाच्या शीर्षस्थ नेतृत्वाला विनंती करणार आहे की त्यांनी मला सरकारमधून मोकळं करावं आणि पक्षात पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी. त्यानंतर पक्षनेतृत्व जे सांगेल, त्यानुसार मी सगळं करणार आहे”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं
छगन भुजबळ यांनी काय म्हटलं आहे?
देवेंद्र फडणवीस यांना आपल्यामुळेच हे सगळं झालं असावं असं वाटत असावं. यश आणि अपयश असेल ही सगळ्यांची जबाबदारी आहे. एकावर ठपका ठेवण्यात काही अर्थ नाही असं माझं (Chhagan Bhujbal ) मत आहे. महायुतीचं जहाज थोडसं वादळात अडकलं आहे. अशावेळी जे कॅप्टन आहेत त्यांनी अशी भूमिका घेणं बरोबर होणार नाही. सगळ्यांनी एकत्र राहून विधानसभेची जोरदार तयारी करायला हवी. नुकसान वगैरे जे काही भाजपा, एनडीएचं झालं आहे ते महाराष्ट्रातच झालं नाही. देशात अनेक ठिकाणी उलथापालथ झाली आहे. त्यामुळे त्याचा ठपका एकट्या फडणवीसांवर ठेवणं योग्य नाही. आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहोत, सगळे तुमच्या पाठिशी आहोत. येण्याऱ्या चार महिन्यात विधानसभा निवडणूक पार पडते आहे त्यात हे अपयश धुऊन काढलं पाहिजे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.
सरकारमधून फडणवीस दूर झाले तर..
सरकारमधून अशा प्रकारे देवेंद्र फडणवीस यांनी दूर होऊ नये. देवेंद्र फडणवीस सरकारमधून दूर झाले तर अडचणी निर्माण होतील. सरकार व्यवस्थित चालण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत असलं पाहिजे. त्यांनी उपमुख्यमंत्री असणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सोडून जाण्याचं, राजीनामा देण्याचा निर्णय घेऊ नये.
जो निकाल लागला आहे, त्यामागे अनेक घटना आहेत. काही अडचणी निर्माण झाल्या आहेत, चुका झाल्या असतील. कापूस,सोयाबीनचे प्रश्न नडले हे देवेंद्र फडणवीसही म्हणाले होते. तसंच मी मागेही म्हटलं होतं की ४०० पारचा नारा विरोधी पक्षाने त्या विरोधात प्रचार केला होता. तो नारा द्यायला नको होता कारण संविधान बदलाच्या चर्चा त्यामुळे झाल्या. देशभरात उलटसुलट घटना झाल्या आहेत ज्याचा परिणाम निकालांवर दिसला आहे असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी म्हटलं आहे.