29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयभले शाब्बास, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही, असे तर मोदी हे...

भले शाब्बास, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही, असे तर मोदी हे शिंदे-फडणवीसांना सांगत नसावेत ना?

फडणवीस यांनी ट्विटरवर शेयर केलेल्या फोटोवरून चर्चेला उधाण; हे तिघे कुठल्या विनोदावर हसताहेत? उद्धव ठाकरे-संजय राऊत यांना मामा बनविल्याची तर ही चर्चा नसेल ना...?

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काल विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी मुंबईत येऊन गेले. त्यासंदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक फोटो ट्विटरवरून शेयर केला आहे. (Devendra Fadnavis Twitter Post) या फोटोत मोदी-फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेही दिसत आहेत. तिघे एका विनोदावरून खळखळून हसत असल्याच्या या फोटोवरून आता चर्चेला उधाण आले आहे. “भले शाब्बास, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही,” असे तर मोदी हे शिंदे-फडणवीसांना सांगत नसावेत ना? अशी टिपणी होत आहे.

फडणवीस यांनी ट्विटरवर शेयर केलेल्या या फोटोवरून हे तिघे कुठल्या विनोदावर हसताहेत, यांचे कुतूहल निर्माण झाले आहे. फडणवीस यांनी हा फोटो शेयर करताना Guess the conversation. 😄 (काय संभाषण सुरू आहे ते ओळखा) एव्हढीच सूचक कॅप्शन एका हसऱ्या स्मायलीसह टाकली आहे. त्यावरून, “उद्धव ठाकरे-संजय राऊत यांना मामा बनविल्याची तर ही चर्चा नसेल ना…?” अशाही प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. फडणवीस यांना कुठली प्रतिक्रिया अपेक्षित असेल आणि हा फोटो शेयर करण्यामागे त्यांचा हेतू काय, यावरही खल होत आहे.

दुसरीकडे, “अच्छे दिन आएंगे”चे स्वप्न पाहणाऱ्या जनतेला कसे उल्लू बनविले, यावरून तर हे तिघे हसत नसतील ना, अशी उपहासात्मक टिप्पणीही येत आहे. एका यूझरने ट्रेनमध्येही साहेबांसोबत फोटोग्राफर असतोच असा टोला लगावला आहे. (फोटोत मागे काचेत पाहा, फोटोग्राफर दिसतोय!)

काही निवडक प्रतिक्रिया अशा –

  • मोदी जी – भाई ठाकरे को तो घर बिठा दिया… लुडो खेल रहे होंगे बाप बेटे…
  • शिंदे : बिल क्लिंटन विचारत होते एकनाथ शिंदे कोण आहेत? केवढे काम करतात, कधी खातात, कधी झोपतात ?
    मोदीजी : अरे एकनाथ राव, इतना तो मै भी नहीं फेंकता.
  • 2024 मे तो हमलोगही आ रहे है… 2029 का प्लान करना है, और आप दोनो महाराष्ट्र 2.0 का तैयारी किजिये 😊 सही कहा ना सर?
  • मूड बना लिया कि नहीं !
  • संजय राऊत के क्या हालचाल है?
  • तू पण लय लांब लांब फेकतो की माझ्या सारखं..🤣
  • खोटं बोलणं ही एक कला आहे, मागच्या वेळेस छत्रपतींचे शिवस्मारक बांधून देण्याचे आश्‍वासन दिले, खोटं खोटं जलपूजन केले, आत्ता पण असेच खोटं बोलून वेळ मारून नेऊ. 15 लाख, 2 करोड नोकर्‍या दर वर्षी, सामान्य लोकांचे सरकार आणि हो हिंदुत्व!
  • भाऊ स्वत:च्या घरात जरा लक्ष द्या, मग अशा फालतू गोष्टी पोस्ट करा 😂😂 नाहीतर मामी रील बनवतील, न तुम्ही फक्त संभाषण ऐकत बसाल!

  • कसं काय तुमच्या समोर महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला नेतो, शिवस्मारकाचे फक्त उदघाट्न करतो परत काहीच करत नाही तरी तुम्हीं शब्द बोलत नाही व पुन्हा तुम्हीच माझे स्वागत करता एव्हढे निर्लज्ज तुम्हीं कसे? हा हा हा हा हा….
  • काय मुर्ख बनवलं महाराष्ट्रच्या जनतेला. सर्व प्रकल्प आपल्या गुजरात ला कसे नेले. आता फक्त मुंबई महाराष्ट्र तून तोडा म्हणजे खेळ खल्लास!
  • संभाषण असे असावे : आज में मूड बना लिया मैं तेरे नाल ही नचना है; मोदी जी का आशीर्वाद ऐसे ही बना रहे, ऐसे ही खूब सारे व्हिडिओ बनाते रहें चाची जी 😍
  • आज के सभा की गूंज मातोश्री तक जायेंगी🔥🔥 और टोमणेसम्राट आणि नातूकी हम कैसे बॅंड बजा रहें😂😂
  • मोदी – तुमचा बेस्ट सीएम कुठे आहे?; शिंदे – घरी भांडी घासतोय!
  • पंतप्रधान: मैं टिकटॉक बॅन गया; मुख्यमंत्री : पर अमृताताई अभीभी टिक टॉक व्हिडिओ बना रही
  • मोदीजी : एकनाथराव; शिंदे : बोला की; मोदीजी : तुमच्या दोघाचा वेषांतराचा किस्सा ऐकला, लै हसलो 😂.. एव्हढं डोकं तर माझं पण चालत नाही राव! हे संभाषण ऐकून बाजूच्याचे गाल लाजूनन लाल झाले

हे सुद्धा वाचा : 

पंतप्रधान मोदी यांनी दोन वेळा शिवरायांचा उल्लेख केला, पण राज्यपालांना खडे बोल सुनावले नाहीत!

मोदींच्या काळात आर्थिक विषमतेत वाढ

भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे फडणवीसांना जड जात आहे – संजय राऊत

  • ह्याला उपमुख्यमंत्री बनवुन कसा गेम केला…
  • तू महाराष्ट्राचा फेकू मी देशाचा फेकू…आपण दोघे मिळून सर्व काही विकू..
  • गोपीनाथ मुंढे साहेब होते तो पर्यंत महाराष्ट्राच राजकारण अलबेल होत; पण फडणवीस तुम्ही आल्यापासून महाराष्ट्राची वाट लावलीत ओ… खूप खालच्या पातळीवर नेलं राजकारण.. असो, जनता सूज्ञ आहे. काळी दाढी, पांढरी दाढी आणि चमन… (करा GUESS 😂😂)
  • आपण तिघे तर हसताय पण मातोश्री सिल्व्हर ओक वाले आणि त्यांचा सालगडी संज्या रडत असणार पोट दुखतयं म्हणून. आता उद्या टोमणे मारणे सुरु केले की त्यांना बरे वाटेल. मुंब्राचा जितृद्दिन पण…
  • आपण काहीही चर्चा करीत असाल, परंतु येवढे निश्चित आहे की एकनाथ शिंदेंना येवढे हसताना पाहून उध्दव ठाकरेंना प्रचंड त्रास होत असेल… आम्हां भाजपा कार्यकर्त्यांना हेच हवे होते… 😊👍

  • हा बघ, शेजारी बसलाय, त्याला मुख्यमंत्री व्हायचे होते. . मी पुन्हा येईन. . आला उपमुख्यमंत्री होऊन 😂
  • आता पुढचा कुठला प्रकल्प देतोस गुजरातला ?
  • 35 पुरणपोळी आणि पातेल् भर तूप 😝
  • लय फडफड करत होता तडफवून घरात बसवला 😂🤣🔥
  • मोदीजी : इथून गुवहाटीला मेट्रो सुरू करायची का ?
  • ED ची पॉवर आहे, तोवर मजा आहे!!
Devendra Fadnavis Twitter Post, Guess the Conversation, Modi Shinde Fadnavis Foto Goes Viral, शिवसेनेचा लय भारी गेम केला तुम्ही, मोदी-शिंदे-फडणवीस फोटो

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी