30 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयधनंजय मुंडेंच्या कार्यालयात आर. आर. पाटील !

धनंजय मुंडेंच्या कार्यालयात आर. आर. पाटील !

आर. आर. पाटील हे नाव ऐकले किंवा वाचले तरी स्वर्गीय आर. आर. आबांचा चेहरा नजरेसमोर उभा राहतो. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री व ग्रामविकास मंत्री या पदांवर आर. आर. आबांनी काम केले होते. आर. आर. आबांमुळे या पदांची शान आणि मान उंचावली. त्यांनी जनताभिमूख कारभार चालवला. आर. आर. आबा हे सामान्य जनतेच्या मनातील ताईत होते. सामान्य लोकांना ते आपलेसे वाटायचे. त्यांना प्रभावी वक्तृत्वाची दैवी देणगी लाभली होती. त्या जोडीला सामान्य लोकांबद्दल त्यांना कमालीची कळकळ सुद्धा होती. या तळमळीच्या नेत्याला लोक हळूहळू विसरत चालले आहेत. पण कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात गेल्यानंतर आबांची निश्चित आठवण येते.

कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या कार्यालयात विविध अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. अधिकाऱ्यांच्या केबिनसमोर प्रत्येकाचे फलक लागलेले आहेत. त्यात एका केबिनसमोर आ. आर. पाटील हा फलक दिसतो. हा फलक पाहताच स्वर्गीय आर. आर. आबांची आठवण होते.

वास्तविक हा फलक आर. आर. पाटील नावाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याचा आहे. विशेष कार्य अधिकारी म्हणून हे दुसरे आर. आर. पाटील धनंजय मुंडे यांच्या कार्यालयात रूजू झाले आहेत.

हे ही वाचा 

मुख्यमंत्री शिंदेंनी २५ लाख दिले नाहीत, रुसवा मात्र शरद पवारांवर!

माढ्याच्या खासदारकीसाठी अजित पवार गटाकडून संजीवराजे नाईक-निंबाळकर?

भाजप 2024 आधीच फुटणार; संजय राऊतांची भविष्यवाणी !

वास्तविक, धनंजय मुंडे आणि आर. आर. पाटील यांच्यात बरेच साम्य आहे. धनंजय मुंडे यांनाही प्रभावी वक्तृत्वाची दैवी देणगी लाभलेली आहे. आर. आर. आबांप्रमाणेच धनंजय मुंडेंचीही जनमाणसांत प्रचंड क्रेझ आहे. आबांप्रमाणेच धनंजय मुंडे सुद्धा सामान्य लोकांसाठी राबत असतात. सरकारी योजना गोरगरीब लोकांपर्यंत नेण्यासाठी अपार कष्ट घेतात.
आर. आर. आबांना भेटायला तळागाळातील लोक मोठ्या संख्येने यायचे. आबांचे कार्यालय व बंगला सामान्य लोकांसाठी सदैव खुला असायचा. धनंजय मुंडेंच्याही कार्यालयात व बंगल्यावर हीच स्थिती असते.

आर. आर. आबांना लोकांची मोठी पारख होती. धनंजय मुंडेंना सुद्धा लोकांची पारख आहे. ते लोकांना जोडतात. आर. आर. आबांच्या कार्यालयातील अधिकारी जनतेच्या सेवेशी सदैव तत्पर असायचे. त्यावेळी योगेश म्हसे, पालांडे, भजनावळे, किशोर गांगुर्डे असे मनमिळावू अधिकारी आबांच्या ताफ्यात होते.

धनंजय मुंडेंच्या दिमतीला प्रशांत भामरे, प्रशांत जोशी, गोपीनाथ कदम, पंडित खेडकर, मुंडे, रविकिरण पाटील असे अधिकारी आहेत. धनंजय मुंडेंप्रमाणेच हे अधिकारीही जनतेच्या गळ्यातील ताईत आहेत. आता या अधिकाऱ्यांच्या टीममध्ये आर. आर. पाटील या नव्या अधिकाऱ्याचा समावेश झाला आहे. आर. आर. पाटील हे सुद्धा अन्य अधिकाऱ्यांप्रमाणे आपला प्रभाव पाडतील, अशी भावना मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमधून व्यक्त केली जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी