26 C
Mumbai
Saturday, December 2, 2023
घरराजकीयधर्मरावबाबा आत्राम यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सुटतात फटाफट

धर्मरावबाबा आत्राम यांच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न सुटतात फटाफट

अन्न व औषध प्रशासनमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी अल्पावधीत आपल्या खात्यात छाप उमटवली आहे. साडेतीन कोटीहून अधिक भेसळयुक्त माल या खात्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली पकडला आहे. त्यामुळे दुधात असो वा औषधात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. अशा या कार्यक्षम मंत्र्याच्या जनता दरबारात जनतेचे प्रश्न फटाफट सुटतात याचा प्रत्यय जनतेला येत आहे. गावातील नागरिकांच्या समस्या, विविध शासकीय योजनांचे प्रश्न, शेतीविषयक अडीअडचणी आदी प्रश्न घेऊन मंत्री आत्राम यांच्या जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यातून माणसे येतात. दर बुधवारी सायंकाळी ४ ते ६ वाजेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रतापगड येथील कार्यालयात या प्रश्नांची चर्चा होते. धडाधड फोन केले जातात. प्रश्नांची सोडवणूक होते. सान-थोर समाधानी होऊन जातात.

आज झालेल्या जनता दरबारात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या जनतेने राजे धर्मराव बाबा आत्राम यांची भेट घेऊन समस्यांचे निवेदन दिले. जनतेच्या विविध सूचना व मागण्या मंत्री आत्राम यांनी समजून घेतल्या. त्या प्रश्नांची नोंद घेण्याचे आदेश दिले. तसेच जनता दरबारात मागील प्रश्न सोडवले गेले का? याचा ही आढावा घेतला. यावेळी माजी मंत्री डॉ राजेंद्र शिंगणे प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी बोलताना मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले की, जनतेच्या समस्या जाणून घेवून सातत्याने सर्व सामान्य जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याची अजित पवार यांची शिकवण आहे. हा विचार घेऊन आम्ही काम करीत आहोत.
राज्यातील शेतकरी शालेय विद्यार्थी अपंग विधवा वंचित उपेक्षित दलित अशा विविध घटकांची त्यांची प्रशासकीय कामे व त्यांच्या अडिअडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून या जनता दरबाराचे आयोजन केले आहे.

या प्रयोगाच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेची अनेक प्रलंबीत कामे मार्गी लागल्याचे चित्र दिसत आहे,. सर्व सामान्य जनतेला त्यांच्या असणाऱ्या हक्काची जाणीव करून देवून त्यांची कामे मार्गी लावण्यासाठ सातत्याने आम्ही प्रयत्नशील आहोत असे मंत्री आत्राम यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

मराठा आरक्षणाच्या लढाईत बॉलिवूडची उडी
अजित पवारांच्या आमदारांची नौटंकी!
साक्षात क्रिकेटचा देव मैदानात उभा ठाकतो तेव्हा…
येणाऱ्या काळामध्ये सुध्दा सर्व सामान्य जनतेसाठी प्रशासनावर अंकुश ठेवून त्यांची न्याय बाजू पुर्ण करण्यासाठी राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम्ही कार्यशील राहू. जनतेने आपल्या अडिअडचणी आमच्याशी संपर्क करून निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये अधिक अधिक संपर्क साधुन लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे मंत्री धर्मरावबाबा आत्राम म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी