30 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeराजकीयगृहमंत्री वळसे पाटलांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले !

गृहमंत्री वळसे पाटलांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले !

टीम लय भारी 

पुणे : गृहमंत्री दिलीप वळसे (Dilip Walse Patil) पाटील यांनी विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आंबेगाव पंचायत समिती कार्यालय घोडेगाव येथील सभागृहामध्ये आढावा बैठक घेतली. यावेळी दिलीप वळसे पाटील यांनी PWD अधिकाऱ्यांचे कान उपटले. यावेळी महसूल विभाग, पंचायत समिती, सार्वजनिक बांधकाम विभाग, विदयुत विभाग, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, कुकडी प्रकल्प, तालुका कृषी विभाग आदि विविध विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. (Dilip Walse Patil instructed PWD officials)

Ani anna Gote advt

तालुक्यामध्ये , विदयुत विभागाने मिटर रिडींग, बंद मिटर, खराब खांब बदलावेत, खते, बि- बियाणे आदिंचा तुटवडा भासणार नाही याची संबंधित विभागांनी दक्षता घ्यावी घोडेगाव येथील हरिश्चंद्र महादेव मंदिर संस्थानचा “क” वर्गासाठी प्रस्ताव दयावा अशा सूचना दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी दिल्या.

तालुक्यामध्ये कुठल्या कामांना किती निधी हवा याची माहिती दयावी तसेच सध्या सार्वजनिक बांधकाम विभाग मार्फत चालू असलेल्या शासकीय कामांवर देखील संबंधित विभागाच्या अधिका-यांनी लक्ष ठेवावे अशा अनेक सूचना यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी केल्या.

छोटे पाटबंधारे, घरकुल, ग्रामपंचायत पाणीपुरवठा, दिव्यांग कल्याण निधी, शरद ग्रामविकास योजना, जलजिवन मिशन, पशुवैदयकीय दवाखाने, पंचायत समिती अंतर्गत विविध विभागातील रिक्त पदे, नविन विहीर, राष्ट्रीय बायोगॅस व सेंद्रीय खत व्यवस्थापन, पशुधन, खते, बि-बियाणे आदिंबाबतची माहिती गटविकास अधिकारी जालींदर पठारे यांनी सांगितली.

रोजगार हमी योजनेबाबतची माहिती, दरड प्रणव क्षेत्रातील गावे, वाडया वस्त्यांचे पुनर्वसन, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसान भरपाई, संजय गांधी योजना, महसूल विभागामध्ये कनिष्ठ व वरिष्ठ लिपिक यांच्या रिक्त पदे, दुष्काळग्रस्त भागामध्ये चालू असलेल्या पाण्याचे टँकर, महास्वराज अभियान पेसा अंतर्गत गावांसाठी शिबिरे आदिंची माहिती यावेळी प्रांत अधिकारी सारंग कोडलकर, तहसिलदार रमा जोशी यांनी सांगितली.


हे सुद्धा वाचा : 

देवेंद्र फडणवीस – दिलीप वळसे पाटील येणार एकाच व्यासपीठावर !

नवनीत राणांचा कोठडीत छळ झालेला नाही : दिलीप वळसे पाटील

No law and order problem in Maharashtra, some elements making issue of non-issue: Dilip Walse Patil

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी