30 C
Mumbai
Thursday, August 31, 2023
घरराजकीयइंडियाच्या संयोजकपदी शरद पवार यांचे नाव चर्चेत

इंडियाच्या संयोजकपदी शरद पवार यांचे नाव चर्चेत

मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या दोन दिवसीय बैठकीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेतली. या बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे. असे असताना या इंडिया आघाडीमध्ये संयोजक म्हणून ज्येष्ठ नेत्याची निवड व्हावी असे वाटत असताना शरद पवार यांचे नाव संयोजकपदी शरद पवार यांचे नाव चर्चेत आहे. दरम्यान 28 पक्षाचे नेते इंडिया आघाडीत आहेत.  पण त्या आधी मल्लिकार्जुन खरगे यांचे नाव संयोजकपदी गुरुवारी सकाळपर्यंत आघाडीवर होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात देशभरातील उत्तरेकडून दक्षिणेकडची आणि पूर्वेपासून पश्चिमेकडचे विरोधक एकवटले असून त्यांनी निर्माण केलेल्या इंडिया आघाडीची बैठक मुंबईतील ग्रँड हयात या हॉटेलमध्ये 31 आणि 1 सप्टेंबरमध्ये होऊ घातली आहे. या बैठकीपूर्वीच पंतप्रधानपदासाठी तीन नावे चर्चेत आले आहेत. यामध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उद्धव ठाकरे आणि समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांचा समावेश आहे. मात्र त्याआधीच आपकडून केजरीवाल पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसल्याचं स्पष्ट केलं. दरम्यान हा बैठकीत उरलेल्या तीन नावांची पंतप्रधान पदासाठी चाचपणी होणार आहे.
हे सुद्धा वाचा
बच्चू कडू को घुस्सा क्यु आया!; ऑनलाईन गेमिंगची जाहीरात सचिनला भारी पडणार!
पंतप्रधानपदासाठी तीन नावे, इंडिया आघाडीच्या बैठकीत होणार चाचपणी!
विधानसभेसाठी गोपीचंद पडळकरांनी ठोकला शड्डू; मतदारसंघ देखील निवडला !

राहुल गांधी यांनी काढलेल्या भारत जोडो यात्रेला मिळालेल्या उदंड प्रतिसादामुळे देश पातळीवरील जनता मोदी यांच्या कारभारावर समाधानी नसल्याचे सिद्ध झाले होते. मुख्य धारेतील माध्यमांनी या यात्रेची दखल फार काही घेतली नाही. पण देश या यात्रेने ढवळून निघालेला होता, आहे. त्यामुळे मोदी विरोधात देश पातळीवर विरोधकांची आघाडी निर्माण झाल्यास केंद्रातील सरकार बदलू शकते असा विचार शरद पवार आणि बिहारचे मुख्यमंत्री  नितीश कुमार यांनी बोलून दाखवल्यावर देशभरातील विरोधक इंडिया या बॅनरखाली एकवटले. आणि बिहार, बंगलोर येथे झालेल्या बैठकीच्या यशानंतर मोदी यांनी एनडीएची मोट बांधली.

इंडियाच्या दोन बैठकांना मिळालेला चांगला प्रतिसाद पाहता, मुंबईत बैठकीचे आयोजन करण्यात आले. आजपासून ही बैठक सुरू होणार आहे, असे असताना आम आदमी पक्षाकडून अरविंद केजरीवाल हे पंतप्रधान पदाचे उमेदवार व्हावे, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली. दरम्यान 28 पक्षाचे नेते इंडिया आघाडीत आहेत. त्यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी शरद पवार यांना संयोजक पद देण्यात येणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी