29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
HomeराजकीयVIDEO : सत्तासंघर्षावर ॲड. उज्ज्वल निकम यांची खास मुलाखत

VIDEO : सत्तासंघर्षावर ॲड. उज्ज्वल निकम यांची खास मुलाखत

निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्य-बाण हे पक्ष चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला बहाल केल्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि उद्धव ठाकरे गटात अक्षरशः कलगीतुरा पाहायला मिळत आहे. महाराष्ट्राची भूमी हा राजकीय आखाडाच झाला आहे. सत्तांघर्षाची सुनावणी आता थेट सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. आज आणि उद्या अशी एकूण तीन दिवस ही सुनावणी चालणार आहे.

या सर्व वादविवादात घटनेच्या दहाव्या सूचीचं संरक्षण शिवसेना पक्षाला आहे का? या मुद्यावरच लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. दहाव्या सूचीतील तरतुदींमुळे एकनाथ शिंदे गटाची राजकीय रणनीती अथवा बंडखोरी कृत्य कशाप्रकारे घटनाबाह्य ठरते, यासंदर्भात युक्तिवाद करण्यात आला आहे. ज्येष्ठ वकील ॲड. उज्ज्वल निकम यांनी याबाबत ‘लय भारी’ला खास मुलाखत दिली आहे.

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी