30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeराजकीयजितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांचे पितळ पाडले उघडे!

जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांचे पितळ पाडले उघडे!

टीम लय भारी

मुंबई : बंडखोरीनंतर शिवसेना आमदार आणखीच वेगळ्या आविर्भावात दिसून येऊ लागले आहेत. कायम बाळासाहेब ठाकरेंच्या नावाची ढाल बनवत संपुर्ण लढाईच्या विजयावर आपलंच नाव कोरण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहेत. हे सगळं करत असताना शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर खिंड लढवत असताना बेताल वक्तव्य करीत आहेत त्यामुळे पुन्हा राजकीय वाद चिघळला आहे. दरम्यान शरद पवारांवर केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याचा डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी चांगलाच समाचार घेतला आहे.

डाॅ. जितेंद्र आव्हाड म्हणाले, “केसरकर मी आपल्या घरी आलो होतो तो साहेबांचा निरोप घेऊन, कि आघाडी धर्म पाळा. आपली जवळ-जवळ अर्धा तास चर्चा झाली व आपण स्पष्ट शब्दांत जी भाषा वापरली ती मी इथे लिहीत नाही. पण, मी कुठल्याही परिस्थितीत मेलो तरी चालेल पण, राणेंचा प्रचार करणार नाही असे सांगून आपल्या दोघांमधील संभाषण थांबले. त्यानंतर मी परत येऊन हाच निरोप आदरणीय शरद पवार साहेबांना दिला. पक्षामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना माहित आहे कि, मी सांगितल्याशिवाय इतका मोठा निर्णय घेणार नाही. मुंबईवरुन येऊन सावंतवाडीमध्ये तुम्हांला निरोप द्यायला इतका मोठा मी पक्षामध्ये नव्हतो. त्यामुळे मला साहेबांनी निरोप दिला हे सत्य लपवू नका.”

जितेंद्र आव्हाडांनी दीपक केसरकरांचे पितळ पाडले उघडे!

“त्यानंतर शरद कृषी भवन च्या उद्घाटनाला आदरणीय शरद पवार साहेब आले. आपण त्या कार्यक्रमाला आलात आणि साहेबांच्या मागून चालण्याचा प्रयत्न केलात. पुढे सगळे कॅमेरावाले फोटो काढत होते, व्हिडीओ शुटींग करत होते. मी आपल्याला तिथे हटकले हे सत्य आहे. आणि तसेही ते मला सूचित करण्यात आले होते म्हणून मी ते काम केले. कारण, त्या फोटोवरुन पुन्हा एकदा सिंधुदुर्गामध्ये गैरसमज निर्माण झाला असता. कारण आपण जे केले होते ते उभ्या सिंधुदुर्गाला माहिती होते आणि तुम्हांला तेच करायच होतं”, असे आव्हाड यांनी केसरकरांना आठवण करून दिली.

“जिल्ह्यात आणि महाराष्ट्रभर गैरसमज निर्माण करुन द्यायचे होते. तो मी नव्हेच असे चित्र तुम्हांला सिंधुदुर्गामध्ये निर्माण करायचे होते. आपल्याला हटकल, आपल्याला बाजूला केलं ह्याचे मला अजिबात दु:ख नाही. कारण, साहेबांचा निरोप धुडकावल्यानंतर तुम्हांला साहेबांच्या बाजूला किंवा मागे चालण्याची गरजच नव्हती. त्यामुळे केलेल्या गोष्टीची मला खंत नाही. उगाच खोटा आव आणायचा होता. आणि तुम्हांला पक्ष सोडायचा होता. तुमचे ते आधीच ठरलेले होते. तुम्हांला फक्त कारण लागत होतं आणि ते कारण तुम्ही जितेंद्र आव्हाड यांच्यावर बिल फाडून मोकळे झालात”, असे म्हणून दीपक केसरकरांना जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी थेट सवाल केला.

पुढे जितेंद्र आव्हाड खडसावीत म्हणाले, “हिंमत होती तर राणेंचा प्रचार करणार नाही, मी या पक्षात राहणार नाही असा निर्णय का नाही घेतलात अधिक इतिहासात मला जायला लावू नका. आज एवढे बोललो… याच्यानंतर परत तुमच्याबद्दल एक अवाक्षर ही काढणार नाही. कारण, सत्य सांगणं ही काळाची गरज होती. ते मी आज सांगितले. तुम्ही आज मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला म्हणून हे सत्य कथन केले.”

“उद्धव ठाकरेंबद्दल बोलाल तर खबरदार ही तुमची भूमिका कौतुकास्पद आहे आपण त्यांना 2014 साली भेटलात पण ज्या पवारसाहेबांनी आपले आयुष्य घडविले त्यांच्या बद्दल आपण जे बोललात ते न पटल्यामुळे मी आपल्या बद्दल बोललो गेली 7.6 वर्ष आपण मला दोष देत होतात मी लक्ष ही देत नव्हतो जेव्हा तुम्ही साहेबांन बद्दल बोललात तेव्हा मी उठलो .. साहेबां बद्दल बोलू नका … बस”, असे म्हणून डाॅ. जितेंद्र आव्हाड यांनी केसरकरांना ठणकावून सांगितले आहे.

हे सुद्धा वाचा…

सैनिक आपसात का भिडताहेत?

संसदेबाबतच्या बिनबोभाट निर्णयांवरून सुप्रिया सुळे यांनी उपटले केंद्र सरकारचे कान

घटस्फोटाचे कारण बनले ‘मंगळसूत्र’, वाचा सविस्तर…

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी