33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयसोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

सोनिया गांधी ईडीच्या शिकार? आज मुंबईसह देशभरात काॅंग्रेसची निदर्शने

टीम लय भारी

मुंबई : राजकारणातील अनेक रथीमहारथींवरील कारवाईनंतर आता ईडीने काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोर्चा वळवला आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात झालेल्या मनी लाॅंन्डरींगबाबत चौकशी करण्यासाठी सोनिया गांधी यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे असून गांधी आज इडीसमोर हजर राहणार आहेत. या समन्सला विरोध दर्शवण्यासाठी काँग्रेस पक्षाकडून ईडी विरोधात आज मुंबईसह देशभरात आंदोलन करण्यात येणार आहे.

काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यावर ईडी चौकशीचे सावट आल्यामुळे राज्यासह अवघ्या देशभरातील काॅंग्रेस पक्षाकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या कारवाईला विरोध दर्शवण्यासाठी सकाळी 11 वाजता मुंबईच्या ईडी कार्यालयावर काॅंग्रेस नेते मोर्चा काढणार आहेत.

सदर मोर्चा जीपीओ चौकातून निघणार असून थेट ईडी कार्यालयापर्यंत पोहोचणार आहे. यावेळी नाना पटोले, भाई जगताप, अशोक चव्हाण, चरणसिंह सप्रा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. केंद्र सरकारच्या निषेधाप्रित्यर्थ मुंबईत ठिकठिकाणी पक्षाचे झेंडे आणि निषेधाचे बॅनर लावून ईडी चौकशीचा काॅंग्रेसने निषेध नोंदवलाआहे.

केवळ मुंबईतच नव्हे तर संपुर्ण देशभरातून ईडी विरोधात आज आंदोलने करण्यात येणार असून काॅंग्रेसच्या या आक्रमक भूमिकेमुळे राजकारणात पुढे काय पडसाद पडणार हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.

नेमकं काय आहे हे प्रकरण?

नॅशनल हेराल्ड हे वृत्तपत्र आहे. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 1938 साली हे वृत्तपत्र सुरू केले होते, त्यामुळे कंपनीच्या सुरवातीपासूनच यावर काॅंग्रेस आणि गांधी घराण्याचेच वर्चस्व होते. दरम्यान 2008 साली हे आर्थिक तोट्यामुळे वृत्तपत्र बंद करावे लागले.

त्यानंतर हे प्रकरण इथेच थांबले नाही. काँग्रेसने पक्ष निधीतून एजेएलला त्यावेळी 90 कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज दिले गेले. त्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यंग इंडियन’ नावाची नवा कंपनी 2010 मध्ये सुरू केली. यामध्ये सोसिएटेड जर्नल्सला दिलेल्या कर्जाच्या बदल्यात यंग इंडियनला कंपनीच्या वाट्याला 99 टक्के हिस्सा आला. सद्यस्थितीत सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांची या यंग इंडियन कंपनीमध्ये 38-38 टक्के सहभाग आहे. बाकीचा हिस्सा मोतीलाल बोरा आणि ऑस्कर फर्नांडिस यांच्याकडे आहे.

राहुल गांधींवर ‘ईडी’वार 

नॅशनल हेराल्डच्या या नाट्यमय घडामोडीनंतर काॅंग्रस, गांधी कुटुंबियांची इडी चौकशी सुरू झाली. जून महिन्यात या प्रकरणी राहुल गांधी यांची ईडी चौकशी करण्यात आली. त्यावेळी सुद्धा देशभरातून काॅंग्रेसने एल्गार पुकारत निषेध व्यक्त केला होता. यावेळी राजकीय सूडबुद्धीपोटी मोदी सरकार हे कृत्य करीत असल्याचा त्यावेळी आरोप सुद्धा करण्यात आला होता.

काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनासुद्धा आधी ईडी चौकशीसाठी बोलवण्यात आले होते परंतु त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाल्याने त्या चौकशीसाठी उपस्थित राहू शकल्या नाहीत, परंतु कोरोनातून बऱ्या झालेल्या सोनिया गांधी या आज ईडी चौकशीला सामोऱ्या जाणार आहेत.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : नवी मुंबई महानगरपालिकेने वैतागून गाठली IIT मुंबई

कल्याणमधील जखमी शिवसेना पदाधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी केला फोन

शिंदे गटातील विजय चौगुलेंनी गणेश नाईकांवर केले आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी