28 C
Mumbai
Monday, April 3, 2023
घरराजकीयशिक्षणमंत्री दीपक केसरकर निघाले लंडनला..!

शिक्षणमंत्री दीपक केसरकर निघाले लंडनला..!

जगभरातील शिक्षण क्षेत्रात गेल्या काही वर्षात झालेले आमूलाग्र बदल स्वीकारून विद्यार्थ्यांना जीवन, संस्कृती आणि नीतीमूल्यांसह शाश्वत विकासाचे धडे देण्यासाठी नवे शैक्षणिक धोरण ठरविण्याच्या उद्देशाने “वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम”तर्फे ७ ते १० मे याकाळात जागतिक परिषद आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेला संपूर्ण जगातील ११० राष्ट्रांचे शिक्षणमंत्री हजर राहणार आहेत. महाराष्ट्रासाठी अतिशय आनंदाची बाब म्हणजे,आपले शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना या परिषदेसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या परिषदेला हजेरी लावण्याच्या निमित्ताने शिक्षणमंत्री केसरकर यांची लंडन वारी घडणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील शिक्षण प्रणालीत प्रचंड बदल घडले असून विद्यार्थांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासह जीवनातील पुढील आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सक्षम करण्याच्या उद्देशाने वर्ल्ड इकॉनॉमिक परिषदेच्या वतीने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुलांमुलींमध्ये कुठल्याही प्रकारचा भेदाभेद न करता त्यांना शिक्षणाच्या समान संधी तसेच शारीरिक क्षमता विकसित करण्यासाठी प्राथमिक स्तरापासून क्रीडा शिक्षणाचा अंतर्भाव आदी मुद्यांवर या परिषदेत उहापोह होणार आहे. महाराष्ट्रातील शिक्षण धोरणाविषयी केसरकर आपली भूमिका मांडणार असून जगभरातील शिक्षण बदलाचा आढावा घेणार आहेत.

हे सुद्धा वाचा: 

शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या कार्यालयात सामान्य जनतेला मिळते अपमानास्पद वागणूक

बदली प्रमाणपत्राशिवायही शाळांमध्ये मिळणार प्रवेश; शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांची घोषणा

Super Exclusive : जिना म्हणाले होते, लोकमान्य टिळकांनी हिंदू – मुस्लिम ऐक्य घडवून देशाची सेवा केली; दीपक केसरकरांनी वितरीत केलेल्या पुस्तकातून समोर आला इतिहास

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी