33 C
Mumbai
Sunday, December 10, 2023
घरराजकीयEknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला 'एकनाथ खडसे' यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले 'खडसावले'

Eknath Khadse : प्रश्नोत्तरांच्या तासाला ‘एकनाथ खडसे’ यांनी सत्ताधाऱ्यांना चांगले ‘खडसावले’

आज विधीमंडळात अभूतपूर्व घडामोडी घडल्या त्या संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पहिल्या. विरोधी पक्षातील नेते हे सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर संतापले होते. बहुतेक सर्वच आमदारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. एकनाथ खडसे यांनी देखील आज प्रश्नोत्तराच्या तासाला विरोधकांना कोंडीत पकडले.

आज विधीमंडळात अभूतपूर्व घडामोडी घडल्या. त्या संपूर्ण महाराष्ट्राने टीव्हीवर पहिल्या. विरोधी पक्षातील नेते हे सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर संतापले होते. बहुतेक सर्वच आमदारांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. एकनाथ खडसे यांनी देखील आज प्रश्नोत्तरांच्या तासाला विरोधकांना कोंडीत पकडले. कारण प्रश्नोत्तरांच्या तासाला अनेक मंत्री हजर नव्हते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील यावेळी हजर नव्हते. त्यावेळी आम्ही त्यांना निरोप दिला आहे ते येतील असे सांगितले.

विचारलेल्या प्रश्नाला दुसऱ्याच खात्याचे मंत्री उत्तर देण्याचे प्रयत्न करत होते. सामुहिक जबाबदारी असली तरी देखील आशा प्रकारे उत्तरे देऊ शकत नाही. त्यामुळे एकनाथ खडसे चांगलेच संतापले. गृहनिर्माण मंत्री कुठे आहे ? पाणी पुरवठा मंत्री कुठे आहे ? या संदर्भातील प्रश्नांना कोण उत्तर देणार असा प्रश्न खडसेंनी विचारला. उत्तरे देणारे मुख्यमंत्री आहेत का ? असा प्रतिप्रश्न त्यांनी विरोधकांना विचारला. त्यामुळे 10 म‍िनीटे सभागृह तहकूब करण्याचा निर्णय निलम गोऱ्हेंनी घेतला.

हे सुद्धा वाचा

Ajit Pawar :’पन्नास खोके एकदम ओके’ या घोषणा विरोधकांना झोंबल्या- अजित पवार

MPSC Result : गरीबीवर मात करत मुलगी बनली ‘क्लास वन’ ऑफिसर

Terrorism: पुण्यात एटीएसने एका दहशवाद्याच्या मुसक्या आवळल्या

महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यांपासून राजकारणाला वेगळेच वळण लागले आहे. कोणाचा कोणाला ताळमेळ बसत नाही. त्यामुळे सत्ता संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी पक्षातले नेते आता विरोधी बाकावर बसले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करुन आमदार पळवून नेले. त्यांचे भाजपसोबत सूत जुळले असून, राज्यात अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे. 40 दिवसानंतर राज्यात मंत्रीमंडळ स्थापन करण्यात आले. मात्र अद्याप सगळया खात्यांचे वाटप झालेले नाही. त्यामुळे विधीमंडळात जनेतेच्या अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कोणीही वाली नाही. अनेक खात्यांना मंत्री नसल्यामुळे महराष्ट्रातले अनेक प्रश्न प्रलंबीत राहिले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी