29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयमोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे...

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

टीम लय भारी

मुंबई : OBC आरक्षणावर येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. परंतु ‘काही चिंता करू नका. हे आरक्षण टिकविण्यात आम्ही यशस्वी होऊ’, असे आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

माजी आमदार व ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच भेट घेतली. मुख्यमंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल शेंडगे यांनी शिंदे यांचे अभिनंदन केले. यावेळी शेंडगे यांनी ओबीसी आरक्षण टिकविण्यासाठी नव्या सरकारने प्रयत्न करावेत,अशी विनंती शिंदे यांना केली.‘ओबीसी आरक्षणाबाबत माझी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झालेली आहे. हे आरक्षण निश्चितपणे टिकेल’ अशी ग्वाही शिंदे यांनी दिल्याचे शेंडगे यांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

महाराष्ट्रातील ओबीसींची शास्त्रशुद्ध आकडेवारी म्हणजेच इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयात देण्यात राज्य सरकारला अपयश आलेले आहे. त्यामुळे मागील सरकारने माजी मुख्य आयुक्त जयंत बांठीया यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. या समितीने आडनावाच्या आधारे डाटा जमा केला होता. ही चुकीची पद्धत असल्याने त्यावर राज्यभरातून जोरदार टीका झाली होती, याकडेही शेंडगे यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

मोठी बातमी : एकनाथ शिंदे म्हणाले, OBC आरक्षण टिकवण्यासाठी माझे आणि फडणविसांचे मजबूत नियोजन

दरम्यान, बांठीया आयोगाचा अहवाल आज सरकारकडे सुपूर्द होणार आहे. सोमवारी न्यायालयात सुनावणी आहे. त्या पार्श्वभूमीवर हा अहवाल आज सरकारकडे सादर होणार आहे. बांठिया आयोगावर लोकांकडून जोरदार टीका झाली होती. आडनावाच्या आधारे जात ठरविण्याच्या पद्धतीवर ओबीसी समाज नाराजा झाला होता. त्यामुळे आजच्या अहवालात बांठिया आयोगाने नक्की काय म्हटले आहे, याकडे ओबीसींचे लक्ष आहे.

 हे सुद्धा वाचा…

‘दलित पँथर’ ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न

भाजपच्या लाडक्या बंडखोर आमदाराने हिंदुत्ववादी फडणवीसांना बनवले ख्रिश्चन

VIDEO : शिवसेनेच्या राणरागिनीने भर बैठकीत बंडखोरांच्या इज्जतीचे काढले वाभाडे !

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी