31 C
Mumbai
Friday, May 19, 2023
घरराजकीयशिवसेना मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय

शिवसेना मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड; शिवसेना राष्ट्रीय कार्यकारिणीत निर्णय

केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या चार दिवसांपूर्वी ‘शिवसेना’ पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह ‘धनुष्यबाण’ एकनाथ शिंदे गटाला दिले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२१) रोजी शिवसेनेची ऱाष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शिवसेनेच्या मुख्यनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुखपदी शिंदे यांची निवड न करता मुख्यनेतेपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. मात्र शिंदे यांच्याकडे पक्षाचे सर्व अधिकार असणार आहेत. (Eknath Shinde as Chief Leader of Shiv Sena; National executive meeting decision)

रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम पक्षाच्या सचिवपदी

निवडणूक आयोगाने एकनाथ एकनाथ शिंदे यांच्याबाजूने निवाडा केल्यानंतर आज शिवसेनेची पहिल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक मुंबईतील हॉटेल ताज प्रेसिडेन्सी येथे पार पडली. या बैठकीत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांचे पुत्र सिद्धेश कदम यांची पक्षाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली.

शिस्तभंग समितीची स्थापना
या बैठकीमध्ये शिवसेना पक्षाची शिस्तभंग समितीची स्थापना केली. या समितीच्या अध्यक्षपदी मंत्री दादा भुसे तर मंत्री शंभुराज देसाई आणि संजय मोरे यांची सदस्यपदी निवड करण्यात आली.

  1. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न देणे
  2. चर्चगेट रेल्वे स्थानकाला माजी केंद्रीय मंत्री चिंतामनराव देशमुख यांचे नाव देणे
  3. राज्यातील भूमीपूत्रांना नोकऱ्यांमध्ये ८० टक्के नोकऱ्या देणे
  4. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणे
  5. स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या मराठी मुलांना भक्कम पाठिंबा देणे.

 

 

हे सुद्धा वाचा : 

सत्तासंघर्षाच्या सुनावणीला वेग; निवडणूक आयोगाच्या निर्णयावर उद्या सुनावणी

खासदार श्रीकांत शिंदे यांनी गुंड राजा ठाकूरला दिली जीवे मारण्याची सुपारी : संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप

घोडेबाजार : आमदारासाठी ५० कोटी, खासदारासाठी ७५ कोटी ; संजय राऊतांचे ‘रेट कार्ड’

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी