28 C
Mumbai
Monday, September 11, 2023
घरराजकीयएकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक,  मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !

एकनाथ शिंदे गटाची तातडीची बैठक,  मंत्रीमंडळ विस्ताराअगोदर नाराजीचा घोळ !

मंत्रीपदावरून नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आमदारांची तातडीने बैठक बोलाविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व आमदारांची नाराजी दूर करून मोजक्या नऊ मंत्र्यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.  

एकनाथ शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार आज होत आहे. थोड्याच वेळात सकाळी ११ वाजता शपथविधी होणार आहे. पण त्या अगोदर म्हणजे, ९ वाजता शिंदे गटाच्या आमदारांची बैठक सुरू झाली आहे. सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत कुणाला मंत्रीपदे द्यायची याचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती आमदार उदय सामंत यांनी दिली. एकूण १८ मंत्री शपथ घेणार असल्याचे सामंत यांनी पत्रकारांना सांगितले. आज सकाळी ७ ते ७.३० या वेळेत एकनाथ शिंदे यांच्या नंदनवन या बंगल्यावरून आमदारांना दूरध्वनीद्वारे निरोप पाठवून तातडीने बैठकीसाठी पाचारण करण्यात आले आहे.

एकनाथ शिंदे नांदेड दौऱ्यावर गेले होते. ते पहाटे तीन वाजता परत आले. त्यावेळी शिवसेनेचे जवळपास १४ आमदार नंदनवन बंगल्यावर उपस्थित होते. मंत्रीपदाची संधी मिळत नसल्याने या नाराज आमदारांनी नंदनवन गाठले. दीपक केसरकर, दादा भुसे, महेश शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार आदी मंत्र्यांची शिंदे यांच्यासोबत दिर्घकाळ घासाघीस सुरू होती. उद्धव ठाकरे यांच्या सरकारमध्ये मंत्री असलेल्यांनाच तूर्त संधी देण्याची भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. त्यामुळे अनेक इच्छूक आमदारांचा हिरमोड झाला आहे.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Assembly Session 2022 : विधिमंडळ अधिवेशनाची तारीख पुन्हा बदलली !

Eknath Shinde Cabinet Expansion : दरेकर, पंकजाताई, राम शिंदे, पडळकर, सदाभाऊ यांना मंत्रीमंडळात स्थान नाही

Eknath Shinde Cabinet Expansion : राम शिंदे, गोपीचंद पडळकरांना मंत्रीपद नाही; धनगर समाजामध्ये संताप

मंत्रीपदावरून नाराजी दूर करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी आमदारांची तातडीने बैठक बोलाविली असल्याचे सूत्रांनी सांगितले. सर्व आमदारांची नाराजी दूर करून मोजक्या नऊ मंत्र्यांच्या नावावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्याचा शिंदे यांचा प्रयत्न असल्याचे सूत्रांनी सांगितले.

कुणाला मंत्रीपदे द्यायची याचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील. पण कोणी नाराज असेल तर त्याबाबत आपणांस कल्पना नाही, असे आमदार दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

संजय शिरसाट नाराज

संजय शिरसाट हे गुवाहाटीवरून ठाकरे यांच्या विरोधात बोलत होते. त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती. त्यांचा पत्ता कापला गेल्याचे बोलले जात आहे. पुढच्या यादीत तुमचे नाव घेतो असे एकनाथ शिंदे यांनी बोळवण केली आहे. परंतु शिरसाट मात्र संतापले. त्यांची शिंदे यांच्यासोबत ‘तू तू मै मै’ झाल्याचे बोलले जात आहे.

सत्तार, राठोड यांचा समावेश नाही

उद्धव ठाकरे सरकारमध्ये अब्दुल सत्तार व संजय राठोड हे दोघेजण मंत्री होते. एका मुलीच्या आत्महत्येप्रकरणात संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. नंतर पोलिसांच्या तपासात त्यांना क्लिन चीट मिळाली आहे. मंत्रीपद पुन्हा मिळेल या आशेने ते शिंदे गटात सामील झाले आहेत. पण त्यांना संधी मिळण्याची कोणतीही चिन्हे नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे ते नाराज आहेत.

अब्दुल सत्तार यांचे मंत्रीमंडळातील स्थान निश्चित मानले जात होते. उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्यमंत्रीपद होते. एकनाथ शिंदे सरकारमध्ये त्यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, अशी चर्चा होती. परंतु काल त्यांच्या मुलींची नावे टीईटी घोटाळ्यामध्ये आली. त्यामुळे सत्तार यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता दुरापास्त झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी