27 C
Mumbai
Saturday, July 22, 2023
घरराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदेनी आधी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर बदलला

Eknath Shinde : एकनाथ शिंदेनी आधी घेतलेला निर्णय मुख्यमंत्री झाल्यावर बदलला

2017 ची वॉर्ड रचना ठेवण्याचे आदेश एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला शिवसेना विरोध करणार आहे. त्यासाठी शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. त्यांनी आज महानगर पालिका निवडणुकांची रणनिती आखण्यासाठी नगरसेवकांची बैठक घेतली. शिवसेना मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुका जिंकणारच आशा आत्मविश्वास उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. तसेच आत्मविश्वास बाळगा, वॉर्डमध्ये फ‍िरा. लोकांची कामे करा असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नगरसेवकांना दिला. जे कोणी सोडून गेले त्यांची पर्वा करु नका. तसेच जनतेची कामे करत राहा. सामाजिक बांध‍िलकी सोडू नका असा सल्ला देखील त्यांनी आज शिवसेनेच्या नगरसेवकांना दिला. कुणाच्याही अमिषाला बळी पडू नका हा सल्ला देखील द्यायला ते विसरले नाहीत.

2017 ची वॉर्ड रचना ठेवण्याचे आदेश एकनाथ शिंदे सरकारने दिले आहेत. त्याला शिवसेना विरोध करणार आहे. त्यासाठी शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे यावेळी उद्धव ठाकरेंनी सांगितले. कारण नव्या वॉर्ड रचनेमध्ये पुन्हा एकदा आरक्षण बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे मत फुटण्याच शक्यता नाकारता येत नाही. कोर्टाचा निर्णय लागण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. तसेच पावसाळयात साथीचे आजार पसरत असतात. त्यामुळे मुंबईकरांच्या मदतीला धावून जा असेही त्यांनी यावेळी नगरसेवकांना सांगितले. एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाने शिवसेनेला मोठ‍ा झटका दिला. त्यानंतर शिवसेनेतून अनेक खासदारांनी वेगळी वाट धरली. अनेक नगरसेवकांनी देखील शिवसेनेला रामराम ठोकला. त्यामुळे उद्धव ठाकरे आता नव्याने पक्ष बांधणीला लागले आहेत.

हे सुद्धा वाचा

Deepak Kesarkar : दीपक केसरकर बच्चू कडूंची नाराजी दूर करणार

Azadi ka Amrit Mahotsav : धनंजय मुंडे – डॉ. प्रीतम मुंडे येणार एकत्र!

VIDEO : नेरूळमध्ये ‘तिरंगा रॅली’

2011 च्या जनगणनेनुसार 2017 साली वॉर्ड संख्या ठरली होती. तिच यंदाच्या निवडणुकीत कायम राहणार असल्याचा निर्णय शिंदे फडणवीस सराकारने घेतला आहे. या निर्णयाला शिवसेनने विरोध केला आहे. एकनाथ शिंदे हे नगरविकास मंत्री असतांना घेतलेले निर्णय मुख्यमंत्री झाल्यानंतर असे बदलू शकतात, असा प्रश्न या धोरणामुळे निर्माण झाला आहे.

आजच्या  बैठकीला 13  माजी नगरसेवक हजर नव्हते. मात्र त्यांनी न येण्याची कारणे आगोदरच पक्षाला कळवली होती. असे क‍िशोरी पेडणेकर यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरे हे अर्लट झाले आहेत. त्यामुळे यावर्षी महानगर पालिकेच्या निवडणुकीची गणिते बदलणार आहेत. या निवडणूकीत उद्धव ठाकरे यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेनेला मोठे खिंडार पडण्याची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थ‍ितीमध्ये ही निवडणूक जिंकण्याचा शिवसेनेचा मानस आहे. त्यामुळे शिवसेनेनेकडून मोर्चे बांधणीला सुरुवात झाली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी