33 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरराजकीयमी कुटुंबाचाच नाही, तर महाराष्ट्राचा विचार करतो; शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

मी कुटुंबाचाच नाही, तर महाराष्ट्राचा विचार करतो; शिंदेचा उद्धव ठाकरेंना टोला

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोना काळात ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून जनतेशी वारंवार संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेशी संपर्क न साधता घरात बसून ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधला यावरून भाजपने त्यांच्यावर सतत निशाणा साधला आहे. त्यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या घोषणेवरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडले आहे. आम्ही केवळ आमच्या कुटुंबाचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा विचार करतो. माझे कुटुंब, माझी जबाबदारी आमची घोषणा एवढी मर्यादित आणि संकुचित नाही. आमची घोषणा आहे माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र ही आमचंं ब्रीद वाक्य आहे. आम्ही छोटा विचार करत नाही, अशा उपरोधिक भाषेत एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. (Eknath Shinde criticize Uddhav Thackeray)

राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विरोधकांना उत्तर देत असताना जाहिरातीचा विषय निघाला असता एकनाथ शिंदे यांनी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या उद्धव ठाकरेंच्या घोषणेची खिल्ली उडवली. ते म्हणाले, “ते जाहिरातीचं जाऊ द्या.. आधी फक्त माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एवढीच घोषणा होती. मात्र आमचं ब्रीद वेगळं आहे. माझा महाराष्ट्र आणि गतिमान महाराष्ट्र हे आमचं ब्रीद आहे. आम्ही मर्यादित आणि संकुचित विचार करत नाही”.
माविआ सरकारच्या काळात कायदा आणि सुव्यवस्थेचे कसे धिंडवडे निघाले होते यावर एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या काळात गृहविभाग कसं काम करत होता? हे सर्वांनाच माहित आहे. साधू हत्याकांड झालं, लष्कराच्या माजी अधिकाऱ्याला मारहाण झाली, जळित कांड झालं, संभाजीनगरच्या दुर्दैवी घटना घडली, मुंबईतल्या साकीनाका भागात दुर्दैवी घटना घडली, शर्जील उस्मान, मनसुख हिरेन कितीतरी प्रकरणं राज्यात उद्धव ठाकरेंच्या काळात घडली पण काहीही घडलं नाही.”

हे सुद्धा वाचा

सुश्मिता सेनला हृदयविकाराचा झटका ; राजीव सेनची भावुक पोस्ट

Vedio : येऊरच्या जंगलात २४ तास मिळतेय दारू आणि बाई ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्याचा बिहार झालाय!

फडणवीस पुन्हा येणार; पण पुढच्या मार्गाने की मागच्या दाराने, संजय राऊतांचा उपमुख्यमंत्र्यांना चिमटा

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी