28 C
Mumbai
Sunday, September 4, 2022
घरराजकीयEknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःला म्हटले 'कंत्राटी मुख्यमंत्री'

Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी स्वतःला म्हटले ‘कंत्राटी मुख्यमंत्री’

पावसाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस सुद्दा वादळी ठरला. वेगवेगळ्या मुद्यांवरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात चांगलीच जुंपल्याचे पाहायला मिळाले. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल करीत आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी कधीही गद्दारी केली नाही, तर आम्ही त्यांचे विचार पुढे नेण्याचे काम करत असल्याचे निक्षून सांगितले. शिवसेनेविरोधात बंड केल्यामुळे ठाकरे आणि शिंदे यांच्या नात्यात दुरावा आला असून दरवेळी एकमेकांविरोधात आगपाखड करत असल्याचे ते दिसून येत आहेत. सभागृहात आज विरोधी गटाकडून एकनाथ शिंदे यांचा उल्लेख ‘कंत्राटी मुख्यमंत्री’ असा करण्यात आला त्यावर प्रत्युत्तर करीत असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, असे म्हणून त्यांनी विरोधकांनाच टोला लगावला आहे.

सभागृहात आज विरोधी गटाकडून एकनाथ शिंदे यांना कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून चिडवण्यात आले, परंतु त्यावर हल्लाबोल करीत असंगांशी संग करण्यापेक्षा मी कंत्राटी मुख्यमंत्री म्हणून कधीही बरा, तुम्ही तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना जेवणाच्या ताटावरून उठवलंत आणि त्यांना जेलमध्ये टाकलं असे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी उद्धव ठाकरे आणि विरोधी गटातून चिडवणाऱ्यांना म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या प्रकरणाची आठवण करीत नारायण राणे यांनी मुख्यमंत्री यांना वापरलेल्या अपशब्दामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता, असे म्हणत टीका करणाऱ्या विरोधकांना त्यांनी धारेवर धरले आहे.

हे सुद्धा वाचा…

BDD Chawl Redevelopment : पोलिसांना मिळणाऱ्या घरांच्या किंमतीची मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा

Ajit Pawar : अजित पवारांवर टीका करणाऱ्या सत्ताधाऱ्यांना ‘कॅग’ची चपराक

Terrorist : दहशतवादी केवळ 30 हजार रुपयांत उडवणार होते भारतातील पोस्ट ऑफ‍िस

जेव्हा निती आयोगाच्या बैठकीच्या वेळी फोटो काढण्यात आला, त्यावेळी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना रांगेत शेवटचे स्थान देण्यात आले त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, त्यावर बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, नीती आयोगाच्या बैठकीला गेलो असताना मी त्या ठिकाणी अनेक मुद्दे मांडले. मी मागे तिसऱ्या रांगेत उभा होतो त्यावरुन टीका केली. पण रांग महत्त्वाची नाही, काम महत्त्वाचं आहे. मी राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाला गेलो असताना पहिल्या रांगेत होतो, त्याबद्दल कोणी काही बोललं नाही. इंदिरा गांधींचा मी फॅन होतो, त्यांनी डॅशिंग काम केलं. पण आताच्या पंतप्रधानांनी देशाचा डंका जगभरात बजावला. मग अशा माणसाला भेटायला जायचं तर रांग का बघायची?”

विरोधकांनी यावेळी वेगवेगळे मुद्दे उपस्थित करत सभागृह गाजवले त्यावर सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मत मांडले. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, विरोधी पक्षाच्या लोकांनी राज्यात सरकारने काय केलं पाहिजे हे अंतिम आठवडा प्रस्तावात मांडलं पाहिजे. अजित पवार रोखठोक बोलतात. आम्ही शेतकऱ्यांना करण्यात येणारी मदत पाच हजारावरून 15 हजार केली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विरोधी पक्षाने हलकं फुलकं वातावरण करायचं असतं, पण तुम्ही आम्हाला बोचेल असं बोलत होतात असे म्हणून मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाविरोधात नाराजी व्यक्त केली.

दरम्यान फुटीच्या राजकारणानंतर विरोधकांनी शिंदेगटाला चांगलेच फैलावर घेतले, त्यावर प्रत्युत्तर करीत एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली नाही. काँग्रेसला जवळ करायचं नाही, त्यांना जर कधी जवळ करायची वेळ आली तर मी माझं दुकान बंद करेन असं बाळासाहेबांनी म्हटलं होतं. आम्ही त्यांचे विचार पुढे घेऊन चाललो आहोत. आम्ही गद्दार असतो तर आमच्या स्वागतासाठी एवढी मोठी गर्दी झाली असती का? असा सवाल करीत त्यांना टोला लगावला आहे.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी