36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदे यांची घोषणा; आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार!

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांची घोषणा; आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारणार!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटालील आमदार, खासदार शनिवार (26 नोव्हेंबर) रोजी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी (आसाम)ला गेले आहेत. आज मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामध्ये पर्यटन आणि कामाख्या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तेथे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटालील आमदार, खासदार शनिवार (26 नोव्हेंबर) रोजी कामाख्या देवीच्या दर्शनासाठी गुवाहाटी (आसाम)ला गेले आहेत. आज मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसामध्ये पर्यटन आणि कामाख्या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या महाराष्ट्रातील नागरिकांसाठी तेथे महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांना सांस्कृतिक दृष्टीने जोडण्यासाठी समन्वयक म्हणून बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे यांनी नियुक्ती केल्याचे देखील ट्विटवरुन सांगितले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”आसाम राज्यात कार्यरत असणाऱ्या मराठी राजपत्रित अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन स्थापन केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या सदस्यांनी काल सदिच्छा भेट घेतली. महाराष्ट्र राज्यातून माता कामाख्या देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या नागरिकांसाठी सोयीसुविधा पुरवण्याचे काम हे मंडळ अविरतपणे करते. मात्र एवढ्यावरच न थांबता इथे महाराष्ट्रातून येणाऱ्या पर्यटकांची कायमची सोय व्हावी, यासाठी आसाम राज्यात महाराष्ट्र भवन उभारावे तसेच महाराष्ट्र आणि आसाम राज्यांमध्ये असलेली भक्ती परंपरा, वीररसाची परंपरा, भाषिक आणि सांस्कृतिक साम्यानुसार इथे सांस्कृतिक भवन उभारण्याची मागणी त्यांनी केली. याबाबत सकारात्मकता दर्शवत दोन राज्यांना सांस्कृतिक दृष्टीने जोडण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करण्यासाठी राज्यातील बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भूसे यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली.”

 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर सुरूवातीला काही आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे मुक्काम ठोकला होता. त्यांनतर त्यांनी सुरतवरून विमानाने गुवाहाटीला मुक्काम हलविला. गुवाहाटीतील हॉटेलमधून त्यांनी सर्व सुत्रे हलवित शिवसेनेतील आणखी आमदार आपल्या गटात वळविले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेऊन गुवाहाटीतून गोव्याला आले. राज्यात भाजपसोबत सरकार स्थापन केल्यानंतर त्यांनी काल पुन्हा आमदारांसह गुवाहाटीला जात कामाख्या देवीचे दर्शन घेतले.

हे सुद्धा वाचा :

IAS, IPS दुष्काळी भागात घडणार; प्रभाकर देशमुखांचा कल्पक उपक्रम!

Lay Bhari : ‘लय भारी’च्या संपादकपदी विक्रांत पाटील यांची नियुक्ती !

Uddhav Thackeray : ‘ज्यांना आपलं भविष्य माहिती नाही ते महाराष्ट्राचं भविष्य ठरवायला निघाले आहेत’

त्यानंतर आज त्यांची आसाममधील मराठी राजपत्रीत अधिकाऱ्यांनी भेट घेत, आसाममध्ये महाराष्ट्रातून पर्यटनासाठी येणाऱ्या, तसेच कामाख्या देवीच्या दर्शनाला येणाऱ्या नागरिकांसाठी येथे महाराष्ट्र भवन उभारण्याची मागणी केली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी देखील सकारात्मकता दाखवत आसाममध्ये महाराष्ट्र भवन उभारण्याची घोषणा केली आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी