29 C
Mumbai
Wednesday, March 27, 2024
HomeराजकीयEknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

Eknath Shinde :‘एकनाथ शिंदेनी तंबाखूला चुना लावला’

आपल्याकडे 75 वर्षांच्या पुढचे 1.5 टक्के नागरिक आहेत. त्यातले किती लोक एसटीने प्रवास करतात.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अल्पवधीत अनेक योजनांची खैरात केली आहे. अनेक लोकहिताचे निर्णय त्यांनी घेतल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या इतके झटपट निर्णय कोणत्याही सरकारने कधीच घेतले नसतील. त्यामुळे मुख्यमंत्री जनतेच्या मनात आपले स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. ते सद्या महाराष्ट्रभर दौरे करत आहेत. त्यांना स्वत:ला मुख्यमंत्री झाल्याचे वाटत नाही. मात्र तरीही ते मोठे मोठे निर्णय घेऊन, मोठया घोषणा करुन जनतेचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत. यावर काँग्रेसचे नेते भाई जगताप यांनी सोशल मीडियावर ताशेरे ओढले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 75 वर्षांवरील नागरिकांना एसटी प्रवास मोफत देण्याची घोषणा केली आहे.

त्यावर भाई जगताप यांचे मत आहे की, आपल्याकडे 75 वर्षांच्या पुढचे 1.5 टक्के नागरिक आहेत. त्यातले किती लोक एसटीने प्रवास करतात. यावर त्यांनी राजा उदार झाला… तंबाखुला लावला चुना..!! अशी उपरोध‍िक शब्दात टीका केली आहे. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे समोर येईल त्याची घोषणा करत आहेत. नुकतीच त्यांनी दही हंडी या सणाला खेळाचा दर्जा द‍िला आहे. त्या स्पर्धा भरविण्याचे सांगितले आहे. त्यातून सरकारी नोकरी मिळणार असल्याचे देखील सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यावर विरोधकांसह स्वपक्षातील नेत्यांनी देखील टीका केली आहे.

हे सुद्धा वाचा

Sujay Vikhe Patil : ‘सुजय विखे पाटलांचे प्रेम सनी लियोनी…’

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

Nilesh Rane : हरिहरेश्वर येथे सापडलेल्या बोटीवरुन निलेश राणेंनी उपटले सरकारचे कान

आपल्याकडे 75 वर्षा वरील नागर‍िक सहसा प्रवास करण्याचे टाळतात. त्यामुळे ते एसटीने जाणे शक्य नाही. फार कमी लोक एसटीने प्रवास करु शकतील. वयोमानाने त्यांना एसटीचा प्रवास झेपणे शक्य नाही. शिवाय महराष्ट्रातले रस्ते चांगले नाही. 75 वर्षांवरील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न असतो. त्यामुळे त्यांचे कुटुंबिय त्यांना सहसा एसटीच्या प्रवासाला पाठवत नाहीत हेच खरे सत्य आहे, असे असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची ही घोषणा मुळात हस्यास्पद असल्याची नागरिकांमध्ये चर्चा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना असे वाटते की, त्यांच्या उदारपणाच‍ी इतिहासामध्ये नोंद व्हावी. आपणही आनंद दिघेंसारखे लोकप्रिय नेता व्हावे. त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोंदींप्रमाणे योजनांची सरबत्ती करुन सामान्य जनतेच्या मनात स्थान निर्माण करायचे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी