22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराजकीयEknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

Eknath Shinde Prakash Ambedkar Meeting:एकनाथ शिंदे प्रकाश आंबेडकरांच्या घरी; काय झाली चर्चा?

शिक्ती-भीशक्तीच्या ऐक्यात उद्धव ठाकरे यांची अग्रणी भूमिका होती. आता पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. युतीच्या चर्चा सुरू असतानाच आज एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने शिंदे गट-वंचित युतीबाबतराजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

शिक्ती-भीशक्तीच्या ऐक्यात उद्धव ठाकरे यांची अग्रणी भूमिका होती. आता पुन्हा एकदा शिवशक्ती-भीमशक्तीच्या चर्चा जोरात सुरू आहेत. युतीच्या चर्चा सुरू असतानाच आज एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतल्याने शिंदे गट-वंचित युतीबाबतराजकीय वर्तुळात चर्चांना उधान आले आहे.

आज एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची त्यांच्या राजगृह निवासस्थानी भेट घेतली. यावेळी शिक्षणमंत्री दिपक केसरकर आणि खासदार भावना गवळी देखील उपस्थित होत्या. प्रकाश आंबेडकर यांच्याशी भेट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. यावेळी कोणतीही राजकीय चर्चा नाही, त्यामुळे कोणीही गैरजमज करुन घेऊ नका, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. शिंदे म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वास्तव्य असलेली ही वास्तू आज मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाली. मी आज सदिच्छा भेट घेतल्याचे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा :
Video : औरंगाबादेतील छेडछाडीच्या घटनेत अल्पवयीन मुलगी जखमी
Navab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार; वानखेडे प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार

Navab Malik : नवाब मलिकांच्या अडचणी वाढणार; वानखेडे प्रकरणात अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार

मागच्या काही दिवसांपासून शिवसेनेचा ठाकरे गट आणि वंचित आघाडी एकत्र येणार असल्याचे बोलले जात आहे. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडक आणि उद्धव ठाकरे हे बोधनकार ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त येत्या २० नोव्हेंबरला मुंबईतील शिवाजी मंदिरमध्ये ‘प्रबोधन डॉट कॉम’ या संकेतस्थळाचं लोकार्पण कार्यक्रमात एकत्र येणार आहेत. त्यामुळे शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित युतीची चर्चा सध्या जोरात सुरू असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्यामुळे वंचित आणि शिंदे गट युती होणार का? अशी चर्चा दिवसभर रंगली आहे. ठाकरे आणि आंबेडकर यांच्या 20 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या कार्यक्रमाआधीच शिंदे यांनी आज प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने चर्चांना उधान आले आहे.

वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी या आधी शिवसेनेचे हिंदूत्व आम्हाला मान्य आहे असे विधान केले होते. त्यामुळे वंचित बहूजन आघाडी आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्या युतीची जोरदार चर्चा राजकीय पटलावर सुरू होती. त्या आधीच एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने प्रकाश आंबेडकर हे ठाकरे गटासोबत जाणार की शिंदे गटासोबत जाणार याबाबत राजकीय वर्तूळात चर्चा रंगल्या आहेत.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!