30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार फोन करतात, मार्गदर्शन करतात, मी त्यांचा आभारी...

एकनाथ शिंदे म्हणाले, शरद पवार फोन करतात, मार्गदर्शन करतात, मी त्यांचा आभारी आहे

ज्यांच्या तोंडी साखर असते असे उद्गार काढत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची स्तुती केली. ते म्हणाले पवार साहेब नेहमीच सर्वांना मार्गदर्शन करत असतात. ते अनुभवी नेते आहेत. ज्यांनी गेली अनेक वर्षे राज्यात देशात विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या त्यांचे योगदान देखील फार मोठे आहे. कुठला माणूस सत्तेवर बसला आहे हे न पाहता या राज्यात राज्याच्या हितासाठी, भल्यासाठी राज्यातील सर्वसामान्य लोकांना मदत होण्यासाठी ते मार्गदर्शन करतात. मला देखील ते आवश्यकता असेल तेव्हा फोन करतात. सुचना मार्गदर्शन करतात. मी त्यांचा आभारी आहे. सहकार क्षेत्रात शरद पवार यांचे योगदान आहे ते कोणालाही नाकारता येणार नाही, असे देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (Eknath Shinde praised Sharad Pawar)

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) मांजरी बु. चा पुरस्कार वितरण कार्यक्रम व ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. कार्यक्रमाला व्ही.एस.आय.चे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, व्ही.एस.आय.चे उपाध्यक्ष माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर, महाराष्ट्र राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, माजी राज्यमंत्री सतेज पाटील, विश्वजीत कदम आदी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

Eknath Shinde praised Sharad Pawar

सगळ्यांनीच गोडगोड बोलायचे आहे
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मागच्याच आठवड्यात संक्रांत झाली. त्यामुळे सगळ्यांनीच गोडगोड बोलायचे आहे. मी देखील नुकताच दावोसला जाऊन आलो. पवार साहेब अमुभवी आहेत त्यांना माहित आहे. कोणी काही म्हटले तरी आपल्या राज्यासाठी मोठी गुंतवणूकीचे सामंजस्य करार झाले आहेत. त्याची अंमलबजावणी देखील होईल त्यामुळे आपल्या सर्वांचे सहकार्य नक्कीच अपेक्षित आहे.

हे सुद्धा वाचा

म्हाडा : मुंबईत तब्ब्ल पाच वर्षांनंतर ४ हजार घरांची सोडत निघणार

जम्मूमध्ये दोन शक्तिशाली बॉम्बस्फोटात सातजण जखमी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

शिवसेनेच्या धनुष्यबाणावर तारीख पे तारीख सुरूच…

मुख्यमंत्री म्हणाले, साखर कारखान्यांना शासनाने नेहमीच सहकार्य केले आहे. भविष्यातदेखील येणाऱ्या अडचणी दूर करण्याचे काम शासन करेल. साखर उद्योगावर लाखो शेतकरी अवलंबून असल्याने हा उद्योग वाढणे आणि टिकणे गरजेचे आहे. शासनाने साखर उद्योगासोबत इतरही शेतकऱ्यांचे मुलभूत प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी