33 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरराजकीयठाकरेंच्या 'जीभ हासडून टाकू'ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

ठाकरेंच्या ‘जीभ हासडून टाकू’ला एकनाथ शिंदे यांचे प्रत्युत्तर

महाराष्ट्रद्रोह्यांसोबत चहापान कारायचे नसल्याचे सांगत महाविकास आघाडीने अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानावर बहिष्कार टाकला. त्यावर ‘बरं झालं देशद्रोह्यांसोबत चहापानाची वेळ टळली अशी खोचक टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर केली होती. त्यावर उद्धव ठाकरे यांनी रविवारी रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील सभेत आम्हाला देशद्रोही म्हणाल तर जीभ हासडून काढू, अशा शब्दांत पलटवार केला आहे. त्याला एकनाथ शिंदे यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंचं हे विधान हास्यास्पद आहे. रोज उठसूट शिव्या-शाप देणं, आरोप करणं, तपास यंत्रणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याविरुद्ध खालच्या पातळीवर बोलणं, असे प्रकार दररोज सुरू आहेत.” (Eknath Shinde responds to the statement of uddhav Thackeray)

उद्धव ठाकरे यांना बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नसल्याचे एकनाथ शिंदे यांनी म्हंटले आहे. ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना शिंदे म्हणाले, “रविवारच्या खेड येथील सभेत स्वातंत्रसैनिकांबातही उद्धव ठाकरे यांनी भाष्य केलं. सावरकरांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून ते बसले. बाळासाहेबांनी जे कधीच केलं नव्हतं. त्यामुळे बाळासाहेबांचं नाव घेण्याचा नैतिक अधिकार त्यांनी २०१९ ला गमावला आहे.” एकनाथ शिंदे यांनी ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीका केली असून फक्त उद्या नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढचं त्यांना सांगतो, असे ते म्हणाले.

आम्ही देशद्रोही नाहीच, आम्ही देशप्रेमी
एकनाथ शिंदे यांनी चहापानावर बहिष्कार घालणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना देशद्रोही असे संबोधले होते. रविवारी खेड येथे झालेल्या सभेत ठाकरे यांनी शिंदे यांच्या विधानाचा परखड शब्दांत समाचार घेतला होता. त्यांच्या या टिप्पणीवर उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले असून तुम्ही आम्हाला देशद्रोही बोलूच कसं शकता, बोलला असता तर जीभ हसडून टाकू. कारण आम्ही देशद्रोही नाहीच आहोत. आम्ही देशप्रेमी आहोत. हे मी मुख्यमंत्री म्हणून बोलत नाही, मी मिंधेंना बोलतोय, अशा आक्रमक शैलीत टीका केली होती.

हे सुद्धा वाचा

भाजपच्या भ्रष्टाचार वॉशिंग मशीनच्या विरोधात उभे राहण्याची हीच ती वेळ

माझ्यावर काहीही आरोप कराल तर याद राखा, मानहानीचा दावा ठोकेन ! रामदास कदम यांचा ठाकरेंना इशारा

मोदींच्या हुकूमशाहीचा देशातील नेत्यांकडून निषेध; सीबीआय, ईडीचा गैरवापर होत असल्याचा पत्राद्वारे आरोप

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी