29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयEknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे...

Eknath Shinde : कामाख्या देवीला रेड्याचे बळी देतात का ?, एकनाथ शिंदे काय म्हणाले ऐका!

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे गुवाहाटीची कामाख्या देवी नावारूपाला आली. अगदी नास्तिक लोकांमध्ये सुद्धा या देवीविषयी कमालीचे औत्सुक्य वाढलेले आहे. या देवीसाठी रेड्याचे बळी द्यावे लागतात. बळी दिल्यानंतर देवी पावते असा समज आहे. याविषयी पत्रकारांनी खुद्द एकनाथ शिंदे यांनाच विचारले. रेड्याचा प्रश्न ऐकताच शिंदे यांनी मात्र घुमजाव केले. रेड्याचा बळी दिला जातो का, असे विचारल्यानंतर ‘कामाख्या देवी कडक व जागृत आहे. विरोधकांनी बोलताना तारतम्य बाळगावे’ असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिली. त्यामुळे शिंदे यांनी रेड्यांचे बळी दिले आहेत किंवा नाही याविषयी सामान्य जनतेमध्ये असलेले कुतूहल आणखी ताणले गेले आहे.

आम्ही चार पाच महिन्यांपूर्वी कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी आलो होतो. आता पुन्हा दर्शन घेण्याची सगळ्यांची इच्छा होती, म्हणून देवीच्या दर्शनाला आलो आहे. आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला निमंत्रण दिले होते, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी पत्रकारांना सांगितले. कामाख्या देवी कडक व जागृत आहे, हे महाराष्ट्राने पाहिले आहे. जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले असल्याचेही शिंदे म्हणाले. कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार होणार का, असे विचारले असता, महाराष्ट्रात गेल्यानंतर यावर मी बोलतो, असे उत्तर त्यांनी दिले.

हे सुद्धा वाचा :

अभिनयच नव्हे तर शिक्षणात देखील या सेलिब्रिटींचा आहे डंका

‘शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुनरागमन करू शकते’

Baba Ramdev : ‘महिलांनी काही घातले नाही तरी त्या चांगल्या दिसतात’

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड करत 40 आमदारांसह सुरतमार्गे आसाम राज्यातील गुवाहाटीला मुक्काम ठोकला होता. यावेळी त्यांनी गुवाहाटीवरुन परत येताना येथील प्रसिद्ध कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील खासदार आणि आमदार मुंबईतून विमानाने गुवाहाटीला दर्शनाला गेले. गुवाहाटीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी मोठ मोठे पोस्टर देखील लागल्याचे पहायला मिळाले. गुवाहाटी येथे आसामच्या मुख्यमंत्र्यांची देखील एकनाथ शिंदे भेट घेणार असल्याची चर्चा आहे. गुवाहाटीत आगमन झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांवर जोरदार टीका करत जर हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा असे आव्हान देखील दिले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी