28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeराजकीयसरकार पडणार म्हणणारे कोणत्या ज्योतिषाकडे जातात माहित नाही; एकनाथ शिंदे यांचा टोला

सरकार पडणार म्हणणारे कोणत्या ज्योतिषाकडे जातात माहित नाही; एकनाथ शिंदे यांचा टोला

एका कार्टूनमध्ये दाखवले आहे की, मुख्यमंत्री म्हणत आहेत की, सरकारला काही धोका नाही. पण मी असे कधीही म्हटलेले नाही. कारण लोकशाहीत बहुमताला महत्त्व असते. काहीजण सांगतात आज सरकार (government)पडेल, उद्या सरकार पडेल. आता ते म्हणतात मी ज्योतिषाकडे जातो. पण ते कुठल्या ज्योतिषाकडे (astrologer) जाऊन विचारतात माहिती नाही. फेब्रुवारी महिना सांगतात पण वर्ष काही सांगत नाहीत. आता २९ फेब्रुवारी आहे की ३० फेब्रुवारी ते त्यांचे त्यांना माहिती, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकांना लगावला. शुक्रवारी पत्रकार दिनाचे औचित्य साधून चौथा स्तंभ राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. (Eknath Shinde’s attack on those who claim that the government will fall)

यावळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमच्या युती सरकारला सहा महिने झाले आहेत आम्ही आमची वाटचाल पाहिली आहे. त्यामुळे सुरूवातीला गेलेवर्षभर तशा आम्ही खुप बातम्या आम्ही दिल्या. त्यावेळेस प्रसारमाध्यमांत बातम्या आल्या. सुरूवातीच्या काळात तुम्ही जास्तीजास्त मलाच दाखवत होता. काही लोकांच्या छातीत धडकी ही होती काय होणार काय होणार अशी, तुम्ही जी वस्तुस्थिती होती ती दाखवत होता. सुरूवातीला मी कुठे होतो ते तुम्हा सर्वांना माहिती होतं. पण तुमच्याशी बोलण्यासाठी एक शांत माणूस हवा होता. मग केसरकर तुमच्याशी संवाद साधत होते. माझ्याशी बोलत होते. त्याकाळात तुम्ही मदत केली, सहकार्य केले.

सरकार स्थापनेच्या सुरुवातीच्या काळाबाबत बोलताना शिंदे म्हणाले, तो सुरूवातीचा काळ आरोप प्रत्यारोपांचा होता. सर्वचजण आरोपाच्या फैरी झाडत होते. पण आम्ही आमच्या धेय्याशी ठाम होतो. कुठलेही काम हाती घेतले की ते टार्गेट अचिव्ह केल्याशिवाय आपल्याला सोडता येत नाही तसे, आम्ही सर्वसामान्य लोकांच्या मनातील सरकार स्थापन करण्याचे मनात ठेवले होते. देशाचे पंतप्रधान मोदींनी देखील आम्हाला सहकार्य केले. गृहमंत्री अमित शहा हे देखील पाठीशी उभे राहिले, कारण हे सरकार गेल्या काही वर्षांचा कालावधी आपण पाहिलेला आहे, त्यानंतर जी परिस्थिती निर्मान झाली होती. त्यामध्ये आम्ही बदल करण्याचे ठरवले.

यावेळी बोलताना शिंदे म्हणाले, आज पत्रकारांचे काम केवळ बातम्या लिहीणे इतकेच आता मर्यादित राहिलेले नाही, यामध्ये राज्याच्या शाश्वत विकासामध्ये त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे. त्यामुळे सरकारचे विविध उपक्रम, योजना, निर्णय ते सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी आम्ही घेत असतो. त्यामुळे त्यात काही सुचना असतील कही त्रुटी असतील काही सुचवायचे असेल तर आम्ही नक्कीच त्याचा आदर करु. पत्रकार समाजात फिरत असतात. त्यामुळे त्यांना खडानखडा माहिती असते, हे सरकार सगळ्यांचे आहे, म्हणून आम्ही सर्वांना सोबत घेऊन लोकाभिमूख काम करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. यापुढे देखील काही सुचना असतील त्याचा आदर केला जाईल याची ग्वाही देतो.

हे सुध्द्धा वाचा

माझ्या नादाला लागू नका, राजवस्त्रे बाजूला काढा मग दाखवतो; संजय राऊत यांचे राणेंना आव्हान

उर्फी जावेदच्या हातात अखेर बेड्या…

‘स्किल इंडिया’ अंतर्गत देशातील तरुणांना प्रशिक्षणाची संधी

शिंदे म्हणाले, आमचे सरकार आल्यानंतर आम्ही पहिलेच अधिवेशन विदर्भात घेतले. जर सरकार बदलले नसते तर विदर्भात अधिवेशन झाले असते की नाही माहित नाही, कारण चायनामध्ये, जपानमध्ये कोरोना सुरू झाला आहे, अशी कोपरखळी देखील शिंदे यांनी यावेळी मारली. पत्रकारांपासून दूर पळणारे आम्ही लोकप्रतिनिधी नाही, कारण आपल्याला भेटल्यानंतर आम्हाला काही विधायक गोष्टी समजतात त्यातून आम्हाला चांगले निर्णय घेण्यास मदत होते. पण नेहमी नेहमी भेटून पण चालत नाही. कारण त्याच्यातून पण मग गडबड होते. आवश्यक तेवढं बोलले पाहिजे या मताचा मी आहे, असे शिंदे यावेळी म्हणाले.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी