36 C
Mumbai
Tuesday, April 16, 2024
HomeराजकीयEknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मिलिंद नार्वेकरांविषयी मोठे वक्तव्य

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मिलिंद नार्वेकरांविषयी मोठे वक्तव्य

राज्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते गणपतींच्या दर्शनाला एकमेकांच्या घरी जात आहेत.

राज्यात शिवसेनेला मोठे खिंडार पडले आहे. एकनाथ शिंदेनी बंडखोरी केल्यामुळे राजकारणाला वेगळे वळण मिळाले आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेते गणपतींच्या दर्शनाला एकमेकांच्या घरी जात-येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील गणतींचे दर्शन करत आहेत. राजकीय नेत्यांच्या गणपती दर्शनामुळे चर्चांना उधाण आले आहे. आता उरले सुरले आमदार पण शिंदे गटात नेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अशी चर्चा त्यामुळे रंगली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खाजगी सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या घरी देखील गणपती आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन बाप्पांचे दर्शन घेतले. दुसरे असे की, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मिलिंद नार्वेकर यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत.  त्यामुळे आता मिलींद नार्वेकर देखील शिवसेनेला राम राम ठोकतील का अशा चर्चांना त्यामुळे उधाण आले आहे.

म‍िलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या बरोबर 29 वर्षे सावली सारखे राहिले आहेत. मात्र मिलिंद नार्वेकर देखील नाराज असल्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. ठाकरेंचा युवा सेनेवर जास्त विश्वास आहे. त्यामुळे ही नाराजी आहे. त्यामुळे या संधीचा फायदा करुन घेण्याचा विचार एकनाथ शिंदे आणि फडणवीस करत आहेत. काही दिवसांपूर्वी अशिष शेलार यांनी देखील त्यांच्या गणपतीचे दर्शन घेतले होते. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र एकनाथ शिंदेंनी मिलिंद नार्वेकर हे माझे चांगले मित्र आहेत,असे एकनाथ‍ शिंदेनी स्पष्टीकरण दिले आहे.

हे सुद्धा वाचा

Higher Education : ‘उच्च शिक्षणाची वाटचाल भांडवलशाहीकडे’

Governor : ‘ठाकरे सरकारची 12 आमदारांची यादी रद्द करणे ही संवैधानिक चूक’

Hemant Soren : ‘अखेर’ हेमंत सोरेन विश्वास दर्शक ठराव जिकंले

आनंद दिघे देखील गणपती बघायला मिलींद नार्वेकर यांच्या घरी जायचे. मी मुख्यमंत्री असलो तरी मैत्री विसरणार नाही. माझे त्यांच्यांशी माझे कौटुंबिक संबंध आहेत. त्यांच्या आईचे न‍िधन झाल्यामुळे यावर्षी त्यांनी कोणालाही आमंत्रण दिले नव्हते. तरी मी गेलो. हे‍ फक्त मैत्रितच घडते. मिलिंद नार्वेकरांनी मात्र यावर कोणती प्रतिक्रीया दिली नाही. ते मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत होते. त्यामुळे त्यांनी कोणतीही प्रतिक्रीया दिली नाही.

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंचे मिलिंद नार्वेकरांविषयी मोठे वक्तव्य

मिलिंद नार्वेकर यांना राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेमध्ये सदस्यांच्या यादीत नाव असावे अशी इच्छा आहे. महाव‍िकास आघाडी सरकारने बनवलेल्या यादीमध्ये त्यांचे नाव नव्हते. त्यामुळे ते त्या वेळपासून नाराज होते. आता गणेशोत्सवानिम‍ित्ताने त्यांच्या घरी मुख्यमंत्री एकनाथ शिदेंनी भेट दिल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अनेक जण असेही म्हणतात की, गणपती पाहायला जाणे हे तर नुसते निमित्त आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी