30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीय‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली...

‘लय भारी’चे भाकीत ठरले खरे, एकनाथ शिंदेच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सात दिवसांपूर्वीच प्रसिद्ध केली होती बातमी

टीम लय भारी

मुंबई : महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रात सामान्य जनतेच्या तसेच राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील, आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे सगळ्यांना वाटत होते. पण प्रत्यक्षात झाले भलतेच.
असे असले तरी एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत ‘लय भारी’ने सात दिवसांपूर्वीच भाकीत वर्तविले होते. एकनाथ शिंदे यांची भूक वाढली आहे. एकनाथ शिंदे यांनी थेट मुख्यमंत्रीपदाचीच मागणी केली आहे. स्वतःसाठी मुख्यमंत्रीपद व मुलगा श्रीकांत याच्यासाठी केंद्रात मंत्रीपद देण्याची मागणी त्यांनी थेट अमित शाह यांच्याकडे केल्याचे वृत्त ‘लय भारी’ने सात दिवसांपूर्वी दिले होते. नवी दिल्लीतील सूत्रांच्या हवाल्याने ‘लय भारी’ने हे वृत्त दिले होते.

सात दिवसांपूर्वीची ‘ती’ बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा 

‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. शिवसेना मला मुख्यमंत्री बनवायला तयार आहे. त्यामुळे ‘महाविकास आघाडी सरकार’मध्ये राहून सुद्धा मी मुख्यमंत्री होऊ शकतो. मी भाजपसोबत यावे असे वाटत असेल तर मला मुख्यमंत्रीपद द्या’ असे बार्गेनिंग शिंदे यांनी अमित शाहांकडे केल्याचे ‘लय भारी’च्या बातमीत नमूद केले होते.

माझ्यासोबत शिवसेनेतून फुटलेले व अपक्ष असे मोठ्या संख्येने आमदार आहेत. भाजप व माझा गट अशा एकूण आमदारांची संख्या 158 ते 160 होऊ शकेल, असे म्हणणे शिंदे यांनी अमित शाहांकडे मांडले होते.
देवेंद्र फडणवीस मोठे होऊ नयेत, यासाठी प्रयत्न करणारा भाजपातही एक मोठा गट आहे. या गटालाही एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद गेले तरी चालेल, असे वाटत असल्याचेही सात दिवसांपूर्वीच्या बातमीत ‘लय भारी’ने नमूद केले होते.

हे सुद्धा वाचा

मोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

फडणवीस सरकार नाही तर, शिंदे सरकार

EXCLUSIVE : एकनाथ शिंदेंची भूक वाढली, भाजपकडे केली मुख्यमंत्रीपदाची मागणी

मोदी – शाहांनी देवेंद्र फडणवीस यांचा ‘गेम’ केला

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात मोठे झाले तर भविष्यात ते पंतप्रधान होऊ शकतात. त्यामुळे त्यांच्या प्रगतीमध्ये कोलदांडा घालण्यासाठी अमित शाह प्रयत्न करतात, अशी गेल्या काही अडीच वर्षांपासून वदंता होती. ती खरीच असल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा एक गट फोडून सुरतमार्गे गुवाहाटीला पलायन केले होते. त्याच वेळी त्यांनी अमित शाह यांच्यासोबत मुख्यमंत्री पदासाठी बार्गेनिंग सुरू केले होते. त्याबाबतची बातमी ‘लय भारी’ने यापूर्वीच दिली होती. ती तंतोतंत खरी ठरली आहे.
गेल्या आठ – दहा वर्षांत राज्यात भाजपचा प्रसार होण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी कष्ट उपसले होते. त्यामुळे नैसर्गिक न्यायानुसार फडणवीस यांनाच मुख्यमंत्रीपदी मिळायला हवे. परंतु अमित शाह यांनी त्यांच्या पायात कोलदांडा घातला. नरेंद्र मोदींकडे अमित शाह यांची किंमत मोठी आहे. त्यामुळे शाह यांचे ऐकून नरेंद्र मोदी यांनी फडणवीस यांना पद्धतशीर बाजूला ठेवल्याच्या चर्चेला आता तोंड फुटले आहे.

महाराष्ट्रात भाजपची सत्ता आणतानाच देवेंद्र फडणवीस यांचे पंख कापण्यात आले. एकनाथ शिंदे यांच्यासारखा ‘सांगकाम्या’ मुख्यमंत्री खूर्चीत बसविला. शिवसेनेला दुबळे केले. अन् मुंबई, ठाणे व नवी मुंबई या प्रमुख महानगरपालिकांमध्ये भाजपचे सरकार आणण्यासाठी खेळी केली. अशा एकाच दगडात अनेक पक्षी मारण्याचे काम मोदी – शाह यांनी केले आहे.
भाजपप्रणीत नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्याकडे कुठलेही संवैधानिक पद नसल्याने फडणवीस यांचे महत्व सुद्धा कमी होईल. किंबहूना मंत्रीमंडळात असलेल्या संभाव्य मंत्र्यांपैकी सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील, आशिष शेलार असे नेत्यांना अधिक बळ मिळेल, असेही सूत्रांनी सांगितले.

नवेली कांबळे
नवेली कांबळेhttp://laybhari.in
Naveli Kamble is a reporter/ sub editor.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी