33 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeराजकीयएकनाथ शिंदेंच्या अध्यात्मिक सेनेत संतांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक सक्रिय !

एकनाथ शिंदेंच्या अध्यात्मिक सेनेत संतांचे वंशज, संत साहित्याचे अभ्यासक सक्रिय !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक क्षेत्रातील अडचणी व समस्यांचे निवारण करुन भक्कम पाठबळ देण्याकरिता आणि हिंदूत्ववादी विचारांच्या प्रसाराकरीता शिवसेना पक्षाच्या वतीने धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना करण्यात आली आहे. या अध्यात्मिक सेनेच्या कार्यकारिणीत आता विविध संतांच्या वंशजांचा, संत साहित्यिकांच्या अभ्यासकांचा, लेखकांचा समावेश करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर आध्यात्मिक सेनेची स्थापना केल्यानंतर हभप अक्षय महाराज भोसले हे यांना आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांच्या नेतृत्वात आता संत नामदेव महाराजांचे वंशज श्रीज्ञानेश्वर महाराज नामदास, संत तुकाराम महाराजांचे वंशज श्रीमाणिक महाराज मोरे, संत एकनाथ महाराजांचे वंशज डॉ. पुष्कर महाराज गोसावी, तसेच मुंबई येथील अध्यात्मिक क्षेत्रातील महिलांचे नेतृत्व कुंदाताई उगले, महानुभाव पंथाचे अभ्यासक शाममहाराज जामोदेकर, संत साहित्याचे अभ्यासक अभय जगताप, श्रीप्रभंजंन महातोले यांची कार्यकारिणी सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

नियुक्त केलेल्या सर्व सदस्यांचा शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचा विस्तार करताना कार्य कर्तृत्ववाचा व अभ्यासाचा अध्यात्मिक क्षेत्रासमवेत शिवसेना पक्षाला सुध्दा फायदा होईल, असे शिवसेना समन्वयक महाराष्ट्राचे नरेश म्हस्के यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

मोठी बातमी : परदेशी महिलेसोबत खोडसाळपणा करणाऱ्याला दोन वर्षाचा तुरूंगवास ! 

रोहित पवार यांनी अमित शाह यांच्या मुलाची अहमदाबादमध्ये घेतली भेट

‘एसटी’ची 30 रुपयांत चहा-नाश्ता स्कीम अजूनही सुरू; अधिकृत MSRTC थांबे, ढाबे, हॉटेल्सना बंधनकारक

शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षयमहाराज भोसले म्हणाले, धर्मवीर अध्यात्मिक सेनेचा कार्य विस्तार होत असताना वारकरी संतांच्या वंशजांसमवेत, अध्यात्मिक क्षेत्रातील जाणकार अभ्यासकांचा देखील यात सहभाग आहे. यामुळे अध्यात्मिक क्षेत्राने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवला आहे. अध्यात्मिक क्षेत्राशी व हिंदुत्ववाच्या विचारावर चालताना स्व. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंदजी दिघे साहेब यांचे विचार आमच्या समोर असणार आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी