33 C
Mumbai
Monday, May 15, 2023
घरराजकीयशिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा; निवडणूक आयोगाने 'हे' मुद्दे घेतले विचारात

शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंचा; निवडणूक आयोगाने ‘हे’ मुद्दे घेतले विचारात

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडल्यानंतर ४० आमदारांसह भाजपसोबत सरकार स्थापन केले होते. त्यानंतर शिंदे यांनी शिवसेना पक्ष (Shiv Sena) आणि पक्ष चिन्ह धनुष्यबाणावर (bow and arrow) देखील हक्क सांगत निवडणूक आगोगात धाव घेतली होती. गेल्या काही महिन्यांपासून यावर निवडणुक आयोगात सुनावणी झाली. त्यानंतर शुक्रवारी निवडणुक आयोगाने या बाबत फैसला केला आणि शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांच्या गटाला सोपविला. (Election Commission by Observations recorded while giving Shiv Sena party and party symbol to Eknath Shinde group)

एकनाथ शिंदे यांचा गट आणि उद्धव ठाकरे यांचा गट दोन्हींनी पक्ष चिन्ह आणि पक्षावर आपला हक्क सांगितला होता. त्यानुसार निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. लाखो शपथपत्रे दोन्ही गटांकडून सादर करण्यात आली होती. तसेच सुनावणी दरम्यान देखील अनेक मुद्द्यांवर दोन्ही गटांकडून युक्तीवाद करण्यात आला होता. आज निवडणूक आयोगाने यासंबधी निकाल देताना जे मुद्दे लक्षात घेतले ते पुढील प्रमाणे.

निवडणूक आयोगाने लक्षात घेतलेले मुद्दे

  •  विधानसभा अध्यक्षांनी दिलेला अपात्रतेचा निर्णयाची कक्षा तसेच ही सुनावणी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असणे आणि निवडणूक आयोगाकडे पक्षचिन्हाबाबतच्या असणाऱ्या तरतूदी या वेगळ्य़ा बाबी. शिवसेना पक्षात फूट पडल्याचे निरिक्षण नोंदविले. बहुमताची चाचणी आणि संघटनेतील बहुमत याचाही विचार निवडणूक आयोगाने केला.
  • १९९९ मध्ये आयोगाच्या म्हणण्यावरून बाळासाहेबांनी लोकशाहीच्या नियमांतर्गत घटना आणली. मात्र १९९९च्या आधीची लोकशाहीविरोधी घटना छुप्या पद्धतीने पक्षात आणली गेल्याचं आयोगाने म्हटलं आहे. त्यामुळे हा पक्ष स्वत:ची मालमत्ता झाली. त्यामुळे पक्षात कोणतीही निवडणूक घेतली गेली नाही, असंही आयोगाने म्हटलं आहे.
  • २०१८ साली झालेल्या शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची निवड प्रतिनिधी सभेने केली होती. त्यामुळे संघटनेत ठाकरे गटाला बहुमत आहे, हा मुद्दा ग्राह्य धरला गेला नाही. त्यामुळे निवडणुकीत कोणत्या गटाला किती मतं मिळाली या मुद्द्यावर भर…
  • २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या विजयी झालेल्या उमेदवारांना पडलेल्या ४७ लाख ८२ हजार ४४० मतांपैकी शिंदे गटाच्या ४० आमदारांना ७६ टक्के म्हणजे ३६ लाख ५७ हजार ३२७ मतं पडली होती. या तुलनेत ठाकरेगटाच्या १५ आमदारांना अंदाजे २४ टक्के म्हणजे ११ लाख २५ हजार ११३ मतं पडली होती.
    तसेच शिवसेनेला एकूण मिळालेल्या ९० लाख ४९ हजार ७८९ मतांपैकी शिंदे गटाला ४० टक्के तर ठाकरे गटच्या १५ आमदारांना १२ टक्के मतं आहेत.
  • शिवसेना पक्षाने २०१८ मध्ये पक्षाच्या घटनेत केलेले बदल लोकशाहीशी सुसंगत नाहीत, पक्षांतर्गत निवडणूक निवडणुका न घेता पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या. त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने निवडणूक आयोगाचा विश्वास गमावला, असे निरीक्षण निवडणूक आयोगाने नोंदवले आहे.

    हे सुद्धा वाचा

शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे गटाला

…तर सरकार वाचले असते; ‘वंचित’ची संजय राऊतांवर टीका

घटनाबाह्य सरकारबाबत घटनापीठाने निर्णय घ्यावा – संजय राऊत

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी