काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणूक पार पडली आहे आणि सगळेच निकालाची वाट पाहत आहेत(Election Commission Works For BJP). निवडणूकीत प्रत्येक मतदार हा समान आहे मग त्याचा जात,धर्म, पंथ, वर्ण एवढच नव्हे तर गरीब असो वा श्रीमंत लोकशाहीमध्ये असे भेदाभेद मानले जात नाही असे आपल्याला सांगितले जाते परंतु याची शहानिशा करताना काही वेगळंच चित्र दिसले.’लय भारी’ चे संपादक तुषार खरात यांनी हीच हकीकत जाणून घेण्याचा प्रयत्न सामाजिक कार्यकर्ते आणि ‘भाकर फाउंडेशन’ चे प्रमुख दिपक सोनावणे यांच्याकडनं सदर मुलाखतीत केलेला आहे. गोरेगाव विभागात निवडणूका पार पडत असताना दिपक सोनावणे यांना बर्याच गोष्टी चुकीच्या घडत आहेत याची जाणीव झाली ते म्हणतात,’जिथे उच्च शिक्षित, आर्थिक दृष्टया सक्षम,श्रीमंत लोक होती त्यांना भ्रमणध्वनी स्विच ऑफ करुन नेण्यासाठी परवानणी होती त्याच उलट जे असंघटित कामगार क्षेत्रातील गोर-गरीब मतदार होते त्यांचे मोबाईल व बँग १०० मीटर अंतरावरच अडवले जात होते’.याबाबत निवडणूक आयोगाच्या अधिकार्यांनसोबत चर्चा करुन अशा असंघटित कामगार व गोर-गरीब मतदारांना भ्रमणध्वनी स्विच ऑफ करुन मतदान करण्याची परवानगी त्या कामगारांना मिळवून दिली. निवडणूक आयोगाचा कारभार ढवाळ असून त्यांचे अधिकारी एखाद्या पक्षाच्या वतीने काम करत होते का असाही प्रश्न दिपक सोनावणे यांनी उपस्थित केला आहे.
Loksabha 2024 | निवडणूक आयोग भाजपसाठी कसा काम करतो, आयोगासोबत काम केलेल्या व्यक्तीने सगळंच सांगितलं
निवडणूकीत प्रत्येक मतदार हा समान आहे मग त्याचा जात,धर्म, पंथ, वर्ण एवढच नव्हे तर गरीब असो वा श्रीमंत लोकशाहीमध्ये असे भेदाभेद मानले जात नाही.परंतु सामाजिक कार्यकर्ते आणि 'भाकर फाउंडेशन' चे प्रमुख दिपक सोनावणे यांनी सदर मुलाखतीमध्ये निवडणूक आयोगाच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.