30 C
Mumbai
Tuesday, April 23, 2024
Homeराजकीयग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष ठरला 'किंग'; वाचा सविस्तर...

ग्रामपंचायत निवडणुकीत कोणता पक्ष ठरला ‘किंग’; वाचा सविस्तर…

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदा ग्रामपंचायतींच्या मोठ्या निवडणूका पार पडल्या. राज्यात ७६८२ निवडणुकांसाठी रविवारी (दि. १८) रोजी मतदान झाले होते. तर मंगळवारी (दि.२०) रोजी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. अद्याप सर्व ग्रामपंचायतींचे निकाल जाहीर झालेले नाहीत. (Election results of 7682 Gram Panchayats in Maharashtra) आता पर्यतं हाती आलेल्या निकालानुसार सर्वाधिक जागा जिंकल्याचा दावा करत भाजपने गावपातळीवर आपलाच पक्ष मजबूत असल्याचे दिसून आल्याचे म्हटले आहे. भाजपने २०२३ ग्रामपंचायतींवर विजयाचा दावा केला आहे. तर शिंदे गटानेही ठाकरे गटाला पिछाडीवर सोडल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीचा विचार केला तर तिन्ही पक्षांनी मिळून २७१५ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवलयांचे म्हटले जात आहे. भाजप-शिंदे गटाने २७९५ ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवत महाविकास आघाडीला देखील पिछाडीवर टाकल्याचा दावा केला आहे. अर्थात ग्रामपंचायत निवडणुका पक्षाच्या चिन्हावर लढविल्या जात नसल्याने दोन्ही बाजूंनी सर्वच पक्ष विजयाचे दावे-प्रतिदावे करत आहेत.

दावे-प्रतिदाव्यांच्या आकडेवारीनुसार, आज झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादीने १२१५ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. तसेच काँग्रेसने ८६१ ग्रामपंचायती जिकल्या असून, (बाळासाहेबांची शिवसेना) शिंदेगटाने ७७२ ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. तर शिवसेना (ठाकरे गट) ६३९ ग्रामपंचायतींवर विजय मिळवला आहे. इतर पक्षांनी ११३५ ग्रामपंचायतींवर सत्तेचा झेंडा फडकविला आहे.

Election results of 7682 Gram Panchayats in Maharashtra

महाविकास आघाडी सरकारच्या काळातील निर्णय फिरवून शिंदे-फडणवीस सरकारने जनतेतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला होता. यात देखील भाजपचा फायदा झाल्याचे दिसून येत आहे. थेट सरपंच निवडीत देखील भाजप अव्वल स्थानावर असून भाजपचे आतापर्यंत १८७३ सरपंचपदाचे उमेदवार निवडून आले आहेत. तर दुसऱ्या क्रमांकावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असून राष्ट्रवादीचे सरपंचपदाचे १००७ उमेदवार निवडून आले आहेत. सरपंचपदाच्या निवडणुकीत देखील शिंदे गटाने ठाकरे गटाला पिछाडीवर टाकल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. शिंदे गटाचे ७०९ सरपंचपदाचे उमेदवार तर ठाकरे गटाचे ५७१ सरपंचपदाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर काँग्रेसचे सरपंच पदाचे ६५७ उमेद्वार निवडून आले असून इतर आणि अपक्षांचे ९६७ उमेदवार निवडून आले आहेत.

हे सुद्धा वाचा
मुंबई महापालिकेतील औषध खरेदीची चौकशी होणार; एकनाथ शिंदे यांची घोषणा

मोदी-शाहांचे खासमखास, गुजरात दणदणीत जिंकवून देणाऱ्या सीआर पाटील यांच्या लेकीच्या पॅनलचा गावच्या निवडणुकीत पराभव

आम्ही मनोहर जोशी, नारायण राणे, फडणवीसांचे देखील सरकार बघितले; अजित पवार विधीमंडळात संतापले

राज्यातील ६१६ ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्या आहेत. निवडणुकीत एकुण ६५,९१६ ग्रामपंचायत सदस्य निवडुण आले असूत त्यातील १४,०२८ सदस्य विनविरोध निवडून आलेले आहेत. तर ७,६१९ सरपंच निवडून आले असून त्यातील ६९९ सरपंचपदाचे उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत. तर राज्यातील एकूण ६३ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नव्हता. अद्याप ग्रामपंचायतींची मतमोजणी सुरू आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी