24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयमीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले 'दादा' कोण?- नाना पटोले

मीरा बोरवणकरांनी उल्लेख केलेले ‘दादा’ कोण?- नाना पटोले

माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर या शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखल्या जायच्या. त्यांच्या कामाचा उरक पाहून जळगाव सेक्स कांड प्रकरणाचा तपास करून आरोपीना शिक्षा दिली होती. ‘मॅडम कमिशनर’ पुस्तकातून मीरा बोरवणकर यांनी अजितदादांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे राजकीय क्षेत्रात विशेषतः राष्ट्रवादी अजित पवार गटात खळबळ माजली आहे. असे असताना कॉंग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी या वादात उडी घेतली आहे. ‘मीरा बोरवणकर यांनी त्यांच्या पुस्तकात, येरवड्याच्या जमीन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित करत तत्कालीन पालकमंत्री ‘दादा’ यांचा त्यासाठी दबाव होता असा उल्लेख केला आहे. बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे.’ असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला.

‘बोरवणकरांनी उल्लेख केलेले मंत्री ‘दादा’ कोण? हे जनतेला कळाले पाहिजे. या सरकारबद्दल पोलीस प्रशासनात तीव्र नाराजी आहे, फोन टॅपिंग प्रकरणाने प्रतिमा डागळलेल्या रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक बनवण्याचा घाट भाजपाच्या काही लोकांनी घातला होता. राज्यात काय चाललंय? ‘असा प्रश्न पटोले यांनी उपस्थित केला. ‘एखाद्या अधिकाऱ्याने घोटाळ्याबद्दल वक्तव्य केले तर त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याची धमकी कसली देता? जर तुम्ही काही केलेले नाही, तर घाबरता कशाला?’ असा प्रश्नही नाना पटोले यांनी विचारला आहे.

पुणे पोलीस आयुक्तपदी मीरा बोरवणकर असताना त्यांनी 2010 मधील प्रकरणाचा उल्लेख केला आहे. कारागृहाशेजारी पोलिस आयुक्तालयाच्या अखत्यारित असलेली तीन एकर जमीन अजित पवार यांनी एका खासगी बिल्डरवर दिल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे. हे लिहिताना त्यांनी अजित पवार यांचे थेट नाव घेतले नाही. परंतु जिल्ह्याचे मंत्री ‘दादा’असे त्यात म्हटले आहे. या तीन एकर जागेवर पोलिसांचे कार्यालय होणार होते, असा दावा पुस्तकातून करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

 येरवडा भूखंडाचे प्रकरण अजित पवारांना शेकणार? मीरा बोरवणकरांचा गंभीर आरोप

‘समाजामध्ये मुघलांसारखी फुट पाडु नका,’ प्रसाद लाड यांची जरांगे पाटलांवर टीका
मराठा आरक्षणाबाबतची क्युरेटिव्ह पिटीशन दाखल करुन घ्यायला ‘सर्वोच्च’ होकार
काय लिहिले आहे पुस्तकात?
‘आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्याचबरोबर आसपासच्या पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांचा आढावा घेतला. एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की, पुण्याचे पालकमंत्री तुमच्याबद्दल विचारत आहेत. तुम्ही त्यांना एकदा भेटा. याचवेळी विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीसंदर्भातील असल्याचंही त्यांनी मला सांगितलं. विभागीय कार्यालयातच मी पालकमंत्र्यांची भेट घेतली. असे मीरा बोरवणकर यांनी पुस्तकात नमूद केले आहे.

‘पालकमंत्र्यांकडे येरवडा पोलीस स्टेशन परिसराचा नकाशा होते. या जागेचा लिलाव झाल्याचे त्यांनी मला सांगितले.. जास्त बोली लावणाऱ्यांसोबत जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी असे त्यांनी सांगितले. त्यानंतर मी पालकमंत्र्यांना मी सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाणी आहे. भविष्यात इतकी मोक्याच्या ठिकाणी जागा पुन्हा मिळणार नाही आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला जागेची गरज आहे.’

‘नुकताच आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारलेला असताना सरकारी जमीन खासगी व्यक्तीला दिल्यास माझ्याकडे चुकीच्या नजरेनं बघितलं जाईल. परंतु त्या मंत्र्याने माझं काहीही ऐकलं नाही आणि जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण करण्याचा आग्रह धरला,’ असं बोरवणकरांनी पुस्तकात म्हटलं आहे. येरवडा कारागृहाशेजारील पोलिसांची तीन एकर जमीन खासगी बिल्डरला दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. पण तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांनी हे आरोप खोडून काढले आहेत.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी