26 C
Mumbai
Sunday, August 7, 2022
घरराजकीयबंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

बंडोबांचे सत्र संपेना! शितल म्हात्रे शिंदे गटात सामील

टीम लय भारी

मुंबई : शिवसैनिक म्हणून मिरवणाऱ्या माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याने शिवसेनेने अखेर त्यांची हकालपट्टी केली आहे. हकालपट्टीनंतर मोठ्या उत्साहात म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीनंतर नगरसेवक, खासदार सुद्धा शिंदे गटाकडे वळत असल्याचे दिसून येत आहे, त्यामुळे शिवसेनेच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.

केवळ आठच दिवसांपूर्वी शीतल म्हात्रे यांनी शिंदे गटाच्या बंडखोरीवर आगपाखड केली होती, शिंदे गटाला धडा शिकवण्याचे सुद्धा वक्तव्य त्यांनी केले होते, परंतु त्यानंतर चित्र वेगळेच दिसायला लागले. म्हात्रे यांनी शिवसेनेच्या विरोधात कारवाया सुरू केल्या त्यामुळे शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याचे शिवसेनेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान शितल म्हात्रे यांनी शिंदे गटाला समर्थन देत त्यांनी शिंदेगटातच प्रवेश केला.

शीतल म्हात्रे यांच्या विरोधाभास कृतीमुळे पक्षामध्ये आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. शीतल म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत शेकडो कार्यकर्त्यांसोबत प्रवेश केला, घोषणाबाजी सुद्धा केली. यावेळी एकनाथ शिंदे आपलेच नेते असे म्हणत कार्यकर्त्यांकडून भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत, तर शिवसेनेत गळचेपी होत असल्याचे शीतल म्हात्रे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा…

गुरूपोर्णिमेसाठी गुलाब खरेदी करताय? मग ‘हे’ वाचायलाच हवे

मुंबईकरांनो.. गरज असेल तरच घराबाहेर पडा, शहरात पावसाचा जोर वाढला

होऊ द्या चर्चा…! पुन्हा मुख्यमंत्री शिंदे चर्चेत

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!