27 C
Mumbai
Saturday, February 4, 2023
घरराजकीयभ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे फडणवीसांना जड जात आहे - संजय राऊत

भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे फडणवीसांना जड जात आहे – संजय राऊत

भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे, फडणवीसांना जड जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आज पुन्हा आपली तोफ चालविली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक बॉम्ब फेकले. शिंदे गटातील मंत्र्यांवर रोज होणारे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप हे बॉम्ब नाही, तर काय आहे? असा सवालही राऊत यांनी केला.  

भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे, फडणवीसांना जड जात आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी आज पुन्हा आपली तोफ चालविली आहे. (Fadanvis Carrying Corruption Vetal) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार शाब्दिक बॉम्ब फेकले. शिंदे गटातील मंत्र्यांवर रोज होणारे वेगवेगळे भ्रष्टाचाराचे आरोप हे बॉम्ब नाही, तर काय आहे? असा सवालही राऊत यांनी केला.

राऊत यांनी ठाण्यात बोलतांना नागपुरातील अधिवेशनात बॉम्ब फोडू असे म्हटले होते. यावरून सत्ताधारी मंडळींनी त्यांची बॉम्ब कसले, हे तर लवंगी फटाकेही नाहीत, अशी खिल्ली उडविली होती. त्याचा राऊत यांनी आज समाचार घेतला. त्यांनी फडणवीस यांना वेगळ्या वाटेने, भ्रष्टाचारी लोकांना पाठीवर घेऊन न फिरता हे ओझे फेकून द्या, असे सुचविण्याचा प्रयत्न केला. राऊत म्हणाले, “भ्रष्टाचाराचा वेताळ पाठीवर घेऊन फिरणे फडणवीस यांना जड जात आहे.आमच्याकडे वेगवेगळ्या मंत्र्यांची 25 प्रकरणे आहेत.  शिंदे गटातील मंत्र्यांवर होणारे आरोप हे बॉम्ब नाही, तर काय आहे?”

शिंदे सरकारला महाराष्ट्राविषयी आजिबात प्रेम नाही, असा आरोपही संजय राऊत यांनी केला. शिदे गटाचे अस्तित्वच बोगस असून आता विरोधी पक्षांचा गळा दाबून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे राऊत म्हणाले.

हे सुध्दा वाचा :

संजय राऊतांचा प्रश्न, फडणवीस तुम्ही कोणाचे चमचे?

डुकराशी कुस्ती नको; या फडणवीसांच्या ट्विटवर संजय राऊतांचा हल्लाबोल

राऊतांनी नामर्द, षंढ सरकार म्हणताच, कन्नडिंगांच्या माजाविरोधात शेपूट घालून बसलेले राज्याचे मंत्री बोलण्यात दाखवू लागले मर्द बाणा!

Fadanvis Carrying Corruption Vetal Shinde Sarkar Bogus Sanjay Raut Slams

 

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!