22 C
Mumbai
Saturday, December 10, 2022
घरराजकीयDevendra Fadanvis : फडणवीस म्हणतात, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल!

Devendra Fadanvis : फडणवीस म्हणतात, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल!

नितीश कुमारांनी बीजेपीसोबत फारकत घेण्याच्या भुमिकेबद्दल फडणविस म्हणाले, बिहारचे राजकारण वेगळे आहे, बिहार बिहार आहे. नितीश कुमारांच्या लक्षात आले की, ज्या जागा ते जिंकले आहेत त्या पंतप्रधान मोदींमुळे जिकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, आता लोक हळूहळू भाजपकडे वळत आहेत. याच कारणामुळे त्यांनी भाजपशी फारकत घेतली, जेणे करुन भाजपला रोखले जाऊ शकेल, मात्र बिहारमध्ये भाजप मागे हटणार नाही, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल.

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी भाजपची साथ सोडत पुन्हा आरजेडीसोबत सरकार स्थापन केले आहे. एनडीए सोडण्याआधी नितीश कुमार आणि त्यांचा पक्ष जेडीयूवर अनेक आरोप केले जात होते. नितीश कुमार हे जेव्हा भाजपशी हातमिळवणी करत सरकार चालवत होते, तेव्हा अनेकदा म्हणत की, माझी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा नव्हती. भाजपच्या सांगण्यावरूनच मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर आता जवळपास दोन वर्षांनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितीश कुमार आणि भाजपच्या बंद दाराआड झालेल्या चर्चेचे हे गुपीत फोडले आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले, बिहारमध्ये जेडीयू हाच मोठ्या भावाच्या भूमिकेत होता. सन 2020 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत जेडीयू 123 जागांवर आणि भाजप 122 जागांवर लढली होती. निवडणुक झाल्यानंतर नितीश कुमार छोटा भाऊ झाले आणि आम्ही मोठा भाऊ झालो. पण तरी देखील आम्ही त्यांना छोटा भाऊ केले नाही, मात्र बिहारच्या जनतेने त्यांना छोटा भाऊ केले.

फडणवीस म्हणाले, निवडणुकीच्या निकालानंतर बंददाराआड काय काय चर्चा झाल्या त्या आम्ही सत्यपणे सांगत आहोत. निकालानंतर नितीश कुमार म्हणाले आमच्या जागा कमी निवडूण आल्या आहेत, त्यामुळे आता तुम्हीच निर्णय घ्यावा, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आपण एकत्रीत घोषणा केली होती की, तुम्ही मुख्यमंत्रीपदाचे उमेद्वार आहात, आणि तुम्ही मुख्यमंत्री होणार आणि निवडणुकीनंतर आम्ही नितीश कुमार यांना मुख्यमंत्री देखील बनविले.
हे सुद्धा वाचा :
Sharad Pawar : शरद पवारांविषयी जितेंद्र आव्हाडांची भावनिक पोस्ट

Anil Gote : अनिल गोटे म्हणतात, शरद पवार आमचे प्रेरणास्रोत !

Sharad Pawar : निवडणुकीसाठी कामाला लागा; शरद पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन
नितीश कुमारांनी बीजेपीसोबत फारकत घेण्याच्या भुमिकेबद्दल फडणविस म्हणाले, बिहारचे राजकारण वेगळे आहे, बिहार बिहार आहे. नितीश कुमारांच्या लक्षात आले की, ज्या जागा ते जिंकले आहेत त्या पंतप्रधान मोदींमुळे जिकल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या लक्षात आले की, आता लोक हळूहळू भाजपकडे वळत आहेत. याच कारणामुळे त्यांनी भाजपशी फारकत घेतली, जेणे करुन भाजपला रोखले जाऊ शकेल, मात्र बिहारमध्ये भाजप मागे हटणार नाही, येणाऱ्या लोकसभेला भाजप चमत्कार करेल.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!