30 C
Mumbai
Thursday, May 18, 2023
घरराजकीयVinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

Vinayak Mete :अखेर विनायक मेटेंच्या अपघातानंतर सरकार जागे झाले

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आयटीएमएस सिस्टीम तयार करण्याचा विचार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सॅटेलाईट इमेज आणि ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला या मर्गावर लक्ष ठेवता येणार आहे.

शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंच्या अपघाती निधनानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेचा विषय पुन्हा ऐरणीवर आला आहे. कारण विनायक मेंटेंच्या पत्नी ज्योती मेटे यांनी आपल्याला मदतीसाठी लोकेशन मिळाले नाही असे म्हटले होते. त्यामुळे आज उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनामध्ये या प्रश्नावर तोडगा काढला. ‍आता अपघात झाल्यावर आपण अपघात न‍ियंत्रण कक्षाला फोन केला, तर अपघाताचे लोकेशन समजणार आहे. अपघात नेमका कुठे झाला याचा तपशील पोलिसांना मिळणार आहे. तसेच ट्रक आपली लेन सोडून जात असेल तर त्यासाठी उपाय योजना करण्यात येणार आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आयटीएमएस सिस्टीम तयार करण्याचा विचार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सॅटेलाईट इमेज आणि ड्रोनच्या माध्यमातून आपल्याला या मर्गावर लक्ष ठेवता येणार आहे. लेन सोडून जाणाऱ्या गाडीमुळे एखादा अपघात झाला तर त्याची महिती यंत्रणेला मिळेल अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात दिली. यावर विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी एक महत्वाचा मुद्दा उपस्थित केला. एक्सप्रेसवेवरुन जाणाऱ्या मोठया आकाराच्या ट्रकमुळे लहान गाडी चालकांना भीती वाटते. त्यासाठी देखील उपाय योजना करता यावी. अनेक वेळा अपघात झाल्यावर हद्दीचा प्रश्न निर्माण होतो. तसे न होता तात्काळ मदत मिळायला हवी. 112 या नंबरवर फोन केल्यानंतर अपघाताच्या ठ‍िकाणाचे लोकेश मिळायला हवे.

हे सुद्धा वाचा

Konkan : अबब ! कोकणच्या रस्त्यांची भयानक चाळण !

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

Farmers protest : किमान आधारभूत किमतीसाठी पुन्हा एकदा शेतकरी देणार सरकारला टक्कर

देवेंद्र फडणवीस यांनी विनायक मेटेंचा अपघात कसा झाला याचा घटनाक्रम सांगितला. त्यांच्या ड्रायव्हरने 112 नंबरला फोन केला होता. परंतु त्याला लोकेशन नीट सांगता आले नाही. त्यामुळे पोलिसांना त्यांचे लोकेशन शोधावे लागले. ते दीड किमीवर होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तात्काळ रुग्णलयात दाखल केले. तोपर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली हाेती. आशा प्रकारे मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर अनेक जणांचे अपघात झाले आहेत. परंतु त्यांना न्याय मिळाला नाही. हा महामार्ग अत्यंत खडतर आहे. विनायक मेंटेंच्या अपघातानंतर का होईना सरकारला जाग आली आहे. मात्र या निर्णयाचे योग्य नियोजन होऊन हे प्रश्न मार्गी लावावा अशी नागरिकांची देखील इच्छा आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी