27 C
Mumbai
Tuesday, August 2, 2022
घरराजकीयओबीसी आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

ओबीसी आरक्षणासाठी मराठा आंदोलक आक्रमक

टीम लय भारी

मुंबई : ओबीसी आरक्षणाच्या पाश्र्वभूमीवर तातडीने सरकारने पावले उचलावी यासाठी मराठा आंदोलक आक्रमक होण्याची शक्यता आहे. आंदोलनाची तयारी देखील सुरु झाली आहे. २६ जूनला शिवाजी मंदिरच्या राजर्षी शाहू सभागृमध्ये मराठा आरक्षण परिषद आयोजित करण्यात आली आहे. विनाकारण लांबत चाललेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकरच सुटावा यासाठी आता अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या नेतृत्वात सकाळी ११ वाजता आक्रमक विचारवंतांची ही ऐतिहासिक परिषद भवण्यात येणार आहे.

न्यायालयाने मराठा आरक्षण देण्यास नकार दिल्यामुळे आता हा प्रश्न वेगळया पातळीवरुन हाताळण्याचे महासंघाने ठरविले आहे. एकीकडे ५० टक्क्यांपुढील कोट्यातून आरक्षण मिळवण्यासाठी घटनादुस्ती, न्यायालयीन लढा सुरु आहे. तर दुसरीकडे ५० टक्के मर्यादेतून ओबीसी कोटयातून मराठयांना आरक्षण मिळावे यासाठीही महासंघाने प्रयत्न सुरु केले आहेत.

मराठा समाज आता पूर्वीसारखा सधन राहिलेला नाही. शिक्षण व नोकरीमध्ये समाजातील तरुणांना अडचणी येतात. या परिषदेत अनेक ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. मराठा समाजाला ओबीसी गटातून आरक्षण मिळावे या मुद्द्यावर भर दिला जाणार आहे. सध्या ५० टक्के आरक्षण मिळावे, यावर भर दिला जाणार आहे. आरक्षणाची टक्केवारी वाढवून मराठा बांधवांना आरक्षण देण्याची मागणी यावेळी करण्यात येणार आहे.

हे सुद्धा वाचा :

Maratha Reservation : संभाजीराजेंनी दिला इशारा, म्हणाले…

अबब ! मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ‘गाढव’छाप कारभार; राष्ट्रवादीच्या नेत्यानेच उघडे पाडले पितळ

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!