29 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीयAshok Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी राजकारणात करणार एंट्री

Ashok Chavan : माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी राजकारणात करणार एंट्री

राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. श्रीजया चव्हाण लवकरच वडील अशोक चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार आहे.

राजकारणात असे अनेक तरुण आमदार-खासदार आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांच्या पायावर पाय ठेवत राजकारणात पदार्पण केले. त्यामुळे राजकारणात राजकीय नेत्यांच्या मुलांचे पदार्पण हे काही नवीन नसले तरी त्यांच्या पदार्पणामुळे नेमके काय होईल ? हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच असते. तसेच एखाद्या राजकीय व्यक्तीचा मुलगी किंवा मुलगी हे राजकारणात पदार्पण करणार अशी बातमी जरी आली तरी ते नेमके कोण आहेत ? हे जाणून घेण्याची देखील उत्सुकता असतेच. राज्याचे माजी मुख्यमंत्री तसेच काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांची मुलगी लवकरच राजकारणात पदार्पण करणार असल्याचे बोलले जात आहे. अशोक चव्हाण यांना श्रीजया आणि सुजया अशा दोन जुळ्या मुली आहेत. यातील श्रीजया चव्हाण लवकरच वडील अशोक चव्हाण यांच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार आहे.

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सुरु आहे. याच माध्यमातून श्रीजया चव्हाण ही राजकारणात आपले पाऊल ठेवणार आहे. पण याबाबतची अधिकृत अशी घोषणा चव्हाण कुटुंबियांकडून करण्यात आलेली नाही. परंतु अनेक राजकीय बॅनरवर, जाहिरातींमध्ये श्रीजया हिचे फोटो छापले जातात. ज्यामुळे श्रीजया चव्हाण हिचे राजकारणातील पदार्पण निश्चित मानले जात आहे. श्रीजया चव्हाण हिचे शिक्षण, मुंबईमध्ये झाले आहे.श्रीजयाने कायद्याचे शिक्षण घेतले आहे. याआधी श्रीजया अनेकदा आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या प्रचार फेऱ्यांमध्ये दिसून आलेली आहे. त्याचमुळे अशोक चव्हाणांचा राजकीय वारसा म्हणून श्रीजयाकडे पाहिले जाते.

अशोक चव्हाण यांचे वडील शंकरराव चव्हाण यांचे राजकारणातील योगदान मोठे आहे. शंकरराव चव्हाण यांना पाच मुली आणि एक मुलगा आहे. परंतु त्यांच्या पाचही कन्येमधील एकही कन्या राजकारणामध्ये सक्रियझाली नाही. पण अशोक चव्हाण यांनी त्यांच्या वडिलांचा राजकीय वारसा पुढे चालवून नावलौकिक मिळवला. अशोक चव्हाण यांनी त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांना देखील राजकारणात सक्रिय करून घेतले. पण एकदा आमदार झाल्यानंतर अमिता चव्हाण यांनी राजकारणातून काढता पाय घेतला. त्या आधीसारख्या आता राजकारणात सक्रिय दिसत नाहीत.

दरम्यान, आता श्रीजया चव्हाण ही चव्हाण कुटुंबाचा राजकीय वारसा पुढे चालवणार असल्याचे म्हंटले जात आहे. अमिता चव्हाण यांच्यानंतर चव्हाण कुटुंबातील आणखी एक महिला राजकारणात लवकरच सक्रिय होणार आहे. अशोक चव्हाण यांना २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव पाहावा लागला होता. पण त्यानंतर श्रीजयाने राजकारणात पडद्याच्या मागे राहून आपल्या वडिलांची प्रचार यंत्रणा उत्तमरीत्या सांभाळली होती.

हे सुद्धा वाचा

Maharashtra Politics : आपले वाद मिटवा व जनतेचे रखडलेले प्रश्न सोडवा, सत्ताधाऱ्यांकडून सामंजस्याचे पाढे

MLA Pratap Sarnaik : शिंदेंच्या सरनाईकाचा ‘प्रताप’ उघडकीस; 11 कोटींच्या संपत्तीवर येणार जप्ती

Petrol-Diesel : आनंदाची बातमी! पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता

महाराष्ट्राच्या राजकारणात अशा अनेक महिला राजकारणी आहेत, ज्यांनी आपल्या वडिलांचा राजकीय वारसा उत्तमरीत्या पुढे नेला आहे. यामध्ये भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या कन्या पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे, भाजपचे नेते प्रमोद महाजन यांची कन्या पूनम महाजन, काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे आणि राज्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आतापर्यंत आपल्या वडिलांचा राजकीय वारसा सांभाळला आहे. यामध्ये लवकरच अशोक चव्हाण यांची कन्या श्रीजया चव्हाण हिचे देखील नाव जोडले जाणार असल्याचे बोलले जात आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी