राज्यात सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरु आहेत. परीक्षांमध्ये कॉपी करण्याच्या प्रकारांना पायबंद बसावा यासाठी महाराष्ट्र बोर्डाने कडक नियमावली जाहीर केली होती. असे असतानाही परीक्षा केंद्रांवरील गैरवर्तन सुरूच आहे. पेपरफुटीचेही प्रकार घडत आहेत. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकारमधील शिक्षण मंत्र्यांवर तोंडसुख घेतले आहे. पन्नास खोक्यांच्या खाली चिरडलेल्या चाळीस डोक्यांचा डोक्याशी संबंध नसल्याची उपरोधिक टीका राऊत यांनी केली आहे. कुचकामी सरकार आणि कोणतेही गांभीर्य नसलेले शिक्षण मंत्री आणि ढिले पडलेले हतबल प्रशासन सध्या महाराष्ट्राच्या नशिबी असल्याने राज्याचे नशीबही फुटीला व पपेरही फुटले असा टोला राऊत यांनी सरकारला लगावला आहे. पन्नास-पन्नास खोके मोजायला गणिताची काय गरज? असे आपल्या शिक्षण मंत्र्यांना वाटले असावे गणिताचा पेपर फुटण्याचे काही कनेक्शन आहे का, ते शिक्षण मंत्र्यांनी जाहीर करून टाकावे, असे आवाहन राऊत यांनी केले आहे. (Forty heads and fifty boxes)
राज्यात शिक्षण क्षेत्रात सध्या गोंधळाचे वातावरण सुरु असून निर्बुद्ध सरकार केवळ अर्थकारणात गुरफटले असल्याची टोलेबाजी संजय राऊत यांनी ‘सामना’मधून केली आहे. महाराष्ट्रात इतर सर्व क्षेत्रांप्रमाणे शिक्षणाचाही खेळखंडोबा सुरु आहे. दहापासून बारावीपर्यंत सगळ्याच परीक्षांचे पेपर फुटत आहेत आणि मुलांच्या ‘व्हॉटस ऍप’ ग्रुपवर फिरत आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगापासून परीक्षांपासून दहावी बारावीपर्यंत सगळ्याच परीक्षांचा बोजवारा उडाला आहे. ‘लोकसेवा आयोगाचे प्रकरण आपण पुढील कारवाईसाठी निवडणूक आयोगाकडे पाठवू’, असे बुद्धिमान विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले होते. तसे बारावी पेपरफुटीचे प्रकरणही ते पुढील निर्णयासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे ते पाठविणार आहेत का? असा खोचक सवाल राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केला आहे.
महाराष्ट्रात एकापाठोपाठ सगळेच पेपर व निकाल फुटताना दिसत आहेत. याआधी स्पर्धा परीक्षांचे, म्हाडाच्या परीक्षांचेही पेपर फुटले. बारावीचा रसायनशास्त्राचा पेपर फुटला व पाठोपाठ गणिताचा पेपर फुटला. हे कसले लक्षण मानायचे? असा प्रश्न संजय राऊत यांनी सरकारला विचारला आहे. निवडणूक आटयोगापासून न्यायालयापर्यंत सर्व निकाल आधीच फुटले आहेत. ‘निवडणूक आयोगाचा निकाल काही झाले तरी आमच्याच बाजूने लागणार. शिवसेना व धनुष्य बाण चिन्ह आम्हालाच मिळणार. सगळे सेटिंग झाले आहे’, असे छातीठोकपणे सांगणे म्हणजे निकाल आधीच फुटल्यासारखे आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. गेल्या सात-आठ महिन्यांपासून महाराष्ट्राच्या समाज जीवनात अशी वाळवी लागणे सुरु झाले आहे. रेडाबळी देऊन जे सत्तेवर आले, त्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीचा बळी दिला आहे, अशी बोचरी टीका राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर केली आहे.
किरीट सोमैय्यांची डॉक्टरेट बोगस
भारतीय जनता पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून स्मृती इराणींपर्यंत प्रत्येकाच्या शैक्षणिक अहर्तेवर, पदव्यांवर शंका, प्रश्नचिन्ह आहेत. महाराष्ट्राचा मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांच्या डिग्र्या बोगस आहेत. प्रत्यक्ष भ्रष्टचाराविरुद्ध लढण्याचे सोंग आणणाऱ्या किरीट सोमैय्यांची डॉक्टरेट बनावट असल्याचे उघड झाले आहे. त्यांच्या डॉक्टरेटचा प्रबंध व संबंधित कागदपत्रे विद्यापीठाच्या रेकॉर्डवर नाहीत. मुंबई भाजपशी संबंधित अनेकांच्या ‘ऑक्सफर्ड’ केंब्रिज’च्या ‘डॉक्टरी’ पदव्या बोगस निघाल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत, अशा शब्दांत भाजप नेत्यांच्या शैक्षणिक पात्रतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
हे सुद्धा वाचा
साताऱ्यात भाजप-शिंदेगट आमने सामने! शंभुराज देसाई अन् उदयनराजेंचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले
Video : वयाच्या सत्तरीत आजी-आजोबांचं शुभमंगल! शिरोळ वृद्धाश्रमातील आनंददायी बातमी