30 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयनागराज मंजुळे यांच्या ' झुंड ' सिनेमाचे गडकरींनी केले तोंडभरून कौतुक !

नागराज मंजुळे यांच्या ‘ झुंड ‘ सिनेमाचे गडकरींनी केले तोंडभरून कौतुक !

टीम लय भारी

नागपुर : नुकताच नागराज मंजुळें दिग्दर्शित झुंड सिनेमा मोठया पडद्यावर झळकला आहे. या चित्रपटाला सध्या उस्पूर्त प्रतिसाद मिळत आहे. झूंड सिनेमा सध्या सिनेसृष्टीत जरा जास्तीत गाजतोय. पण अस कधी झालेलं आपण पाहिलं नाहीय की, कोणता चित्रपट आला आणि त्यावरून वाद झालाच नाही आहे. त्यात आता या चित्रपटावरून देखील सोशल मीडियावर वाद रंगलेला पाहायला मिळतोय. बऱ्याच राजकीय नेत्यांनी आणि काही लोकांनी यावर आपले मत मांडले आहे.(Gadkari praises Nagraj Manjule’s ‘Jhund’)

झुंड चित्रपट हा नागपुरातील फुटबॉल कोच विजय बारसे यांच्यावर आधारित आहे. त्यांनी झोपडपट्टीतील मुलांना गुन्हेगारी विश्वापासून दूर करण्यासाठी त्यांच्यामध्ये फुटबॉलची आवड निर्माण केली. त्यांच्या स्लम सॉकर ही नवी संकल्पना उदयास आणली. अमिताभ बच्चन यांनी बारसे यांची भूमिका साकारली. त्यांच्या या भूमिकेचं देखील कित्येक जणांनी कौतुक केले आहे.

मात्र अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वेळात वेळ काढून झुंड चित्रपट पाहिला आणि नागराज मंजुळे यांचं तोंडभरून कौतुक केलंय. नितीन गडकरींचे नागपुरात अनेक कार्यक्रम होते. त्यामधून वेळ काढून त्यांनी झुंड चित्रपट बघितला. आणि त्यादरम्यान दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचं तोंडभरून कौतुक केलं.

हे सुद्धा वाचा

नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

बॅलो फिल्म्स’ आयोजित अभिनय प्रशिक्षण शिबिर

नागराज मंजुळेचा ‘झुंड’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Amitabh Bachchan and his team took fee cut for Jhund, told producer to spend it on film instead

नितीन गडकरी कौतुक करत म्हणाले, नागराज मंजुळे हे उत्कृष्ट दिग्दर्शक आहेत. त्यांनी सैराट सारखा चांगला चित्रपट केला. त्यांना मी प्रशस्तिपत्र देण्याची गरज नाही. यापूर्वीच फिल्म इंडस्ट्रीने त्यांना त्यांच्या कार्याचे प्रमाणपत्र दिले आहे. झुंड ही अत्यंत सुंदर कलाकृती आहे. लोकांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. त्यांनी छोट्या कलाकारांना मोठी संधी दिली. आता हे कलाकार चांगलं नाव कमावतील, अशा शब्दात त्यांनी नागराज मंजुळेचं कौतुक केलं.

बऱ्याच लोकांनी या चित्रपटावर प्रश्न उभे केले असून ,  लोकांनी उच्च वर्णीयांचा इतकाच राग होता, तर अमिताभ बच्चन यांना चित्रपटात कशाला घेतले? असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला आहे, त्यासोबत बरेचं प्रश्न आता लोकांसमोर उभे झाले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी