32 C
Mumbai
Thursday, December 8, 2022
घरराजकीयNitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक...

Nitin Gadkari : गडकरी म्हणतात दिल्लीत हुशारीने काम करावे लागते; पुढची निवडणूक लढण्याबाबत म्हणाले…

मी एकाला दिल्लीत म्हणालो की 'दिल्लीचे पाणी चांगले नाही, महाराष्ट्र खूप चांगला आहे. दिल्लीत खूप हुशारीने काम करावे लागते

आपल्या तडाखेबाज भाषणांमुळे नेहमी चर्चेत राहणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई आयआयटीमध्ये एका कार्यक्रमात जोरदार भाषण केले, यावेळी ते म्हणाले, मी एकाला दिल्लीत म्हणालो की ‘दिल्लीचे पाणी चांगले नाही, महाराष्ट्र खूप चांगला आहे. दिल्लीत खूप हुशारीने काम करावे लागते, मी माझ्या मतदारसंघात साडेतीन लाख मतांनी जिंकलो, पुढच्या वेळेस पाच लाखांपेक्षा जास्त मतांनी जिंकेन. दिल्लीत गेल्यावर मला एक गोष्ट जाणवली ज्यांना मी खूप मोठं समजत होतो, ती लोकं फार छोटी निघाली.’

यावेळी बोलताना गडकरी म्हणाले, मला पेट्रोल डिझेलला हद्दपार करायचे आहे, हा एक अवघड संकल्प असल्याचेही ते म्हणाले, देशात ई-हायवे बनवण्याचा आमचा प्लॅन आहे. पुढच्या महिन्यात ई-बसनंतर ई-ट्रक लॉन्च करणार असल्याचेही गडकरी म्हणाले. हवेत चालणारी डबल डेकर बस मुंबईत हवीये, त्यासाठी आम्ही अभ्यास करत आहोत. दोनशे लोक वरच्या वर हवेतून प्रवास करणार ही बस पवईतून निघून नरीमन पॉईंटला हवेतून जाणार असे गडकरी यावेळी म्हणाले. यावेळी त्यांनी पुण्यात देखील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी उडत्या बसचा पर्याय सुचविला असून महापालिकेला तसा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले होते असे देखील ते म्हणाले. अहंकारामुळं अनेकदा मॅनेजमेंट लेव्हलला अडचणी निर्माण होतात. संबंध कसे असावे हा सगळीकडेच महत्वाचा विषय आहे, आपण आयात काय करतो ते बघा. त्याला पर्याय शोधा, त्यावर रिसर्च करा त्याचा खूप फायदा होईल, असेही गडकरी यावेळी म्हणाले.
हे सुद्धा वाचा :
Kishori Pednekar : किरीट सोमय्यांनी सात दिवसात आरोप सिद्ध करून दाखवावे : किशोरी पेडणेकर

Rahit Pawar : ज्याला हाफकीन संस्था की व्यक्ती हे माहित नाही त्याला मी कशाला मस्का लावू?; रोहीत पवार यांची बोचरी टीका
एकनाथ शिंदे माझे मित्र…!, तर उद्धव ठाकरेंबाबत काय म्हणाले बच्चू कडू?

यावेळी बोलताना गडकरी यांनी नेहमीप्रमाणे राजकीय फटकेबाजी देखील केली. दिल्लीत ज्यांना मोठे समजत होतो ते छोटे निघाले आणि ज्यांना छोटे समजत होतो ते मोठे निघाले, असे वक्तव्य गडकरी यांनी केल्याने त्यांचे हे वक्तव्य नेमके कुणाबाबत अशा चर्चा देखील राजकीय वर्तुळात आता रंगल्या आहेत. तसेच आगामी निवडणूक लढण्याबाबत देखील गडकरी यांनी यावेळी संकेत दिले, त्यांच्या या संकेतावरून गडकरी आगामी निवडणूकीसाठी कामाला लगल्याचे दिसून येत आहे, कारण पुढची निवडणूक मी पाच लाख मतांनी जिंकणार असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!