30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeराजकीयSharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे -...

Sharad Pawar : गणपती बाप्पाने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे विघ्न दूर करावे – शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती, विघ्नहर्ता श्री गणराय यांनी‍ अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजवरील विघ्न दूर करावे व त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी आणावी ही प्रार्थना.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बुद्धीची देवता, चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचे अधिपती, विघ्नहर्ता श्री गणराय यांनी‍ अतिवृष्टीमुळे संकटात सापडलेल्या बळीराजावरील विघ्न दूर करावे व त्याच्या आयुष्यात स्थैर्य आणि समृद्धी आणावी ही प्रार्थना. आशा शुभेच्छा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोशल मीडियाद्वारे नागरिकांना दिल्या आहेत. राज्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहचला आहे. दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. या वर्षी कोरोनाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे गणेशोत्सव मोठया उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरा होत आहे. सगळीकडे आनंदमयी आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र काही दिवसांपूर्वी आपल्या राज्यात महापूराने थैमान घातले होते.‍

प. महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडयामध्ये पूराने थैमान घातले होते. शिंदे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत देण्याचे कबूल केले. मात्र अजूनपर्यंत शेतकऱ्यांना एक पैसा देखील मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी चिंताक्रांत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सरकारला यावरुन कोंडीत पकडले आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील सरकारला यावरुन धारेवर धरले. खानदेश आणि विदर्भातील शेतकऱ्यांकडे सरकारचे लक्ष नाही. गडचिरोलीमधील आहेरी सारख्या ठिकाणाचे लोक अजूनही घराबाहेर उघडयावर राहत आहेत. कारण पावसामुळे त्यांची घरे मोडली आहे. ती दुरूस्त करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत.

हे सुद्धा वाचा

Chandrakant Patil : पुण्याच्या गर्दीत चर्चा रंगली चंद्रकांतदादांची, वाचा काय घडलं…

Jayant Patil : शेतकरी चिंताग्रस्त आहे पण सरकारने एक ‘दमडी’ दिली नाही – जयंत पाटील

VIDEO : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्या घरचा गणपती

आता गणेशोत्सवाचा सण राज्यात सुरू आहे. मात्र संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांकडे कोणी ढुकूनही पाहत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. या सरकारला गणपती बाप्पांनी चांगली बुद्धी दयावी. त्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावे अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना देखील आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी