28 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
HomeराजकीयGet out Ravi : तामिळनाडूत राज्यपालांविरोधात रान तापले

Get out Ravi : तामिळनाडूत राज्यपालांविरोधात रान तापले

तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) सत्ताधारी आणि राज्यपाल (governor) यांच्यात आता संघर्ष तीव्र झाला आहे. मंगळवारी राज्यभरात राज्यपाल आर.एन. रवि (R.N. Ravi) यांच्याविरोधात थानथाई पेरियार द्रविड़ कज़गम आणि डीएमकेच्या (DMK) कार्यकर्त्यांनी देखील राज्यपाल परत जा अशी जोरदार मोहीम राबविली. तसेच आज दिवसभर सोशल मीडियावर देखील #Getout Ravi असा ट्रेड चालविण्यात आला. डीएमकेसोबत असलेले काँग्रेस, सीपीएम, सीपीएम(एम)ने देखील राज्यपाल आर.एन. रवि यांना विरोध केला. (Get out Ravi Tamil Nadu governor against Outrage)

सोमवारी विधिमंडळाच्या सभागृहात सरकारने दिलेल्या अभिभाषणातील मुद्दे टाळून राज्यपाल आर.एन. रवि यांनी आपले मुद्दे भाषणात मांडले. काल राज्यपालांच्या अभिभाषणावर मुख्यमंत्री एमके. स्टॅलिन यांनी आक्षेप घेत राज्यपालांनी केलेले भाषण विधीमंडळाच्या रेकॉर्डवर न घेता. सरकारने दिलेले भाषणच रेकॉर्डवर घ्यावे असा ठराव मांडला. हा ठराव बहुमताने मंजूर देखील झाला. याच दरम्यान राज्यपाल रागाने सभागृहातून बाहेर पडले.

हे सुद्धा वाचा

संतापजनक : शाहरुख खानच्या बायकोने मराठीची केली ऐसीतैशी!

डॉ. जितेंद्र आव्हाडांनी मुख्यमंत्र्यांना केला सॅल्यूट !

महापालिकांमध्ये स्विकृत नगरसेवकांची संख्या वाढणार

सोमवारी विधिमंडळ सभागृहात अभिभाषण करताना राज्यपालांनी तामिळनाडू राज्याचा उल्लेख टाळून तामिळनाडूचा उल्लेख तमिझगम असा केला. तसेच तामिळनाडूचे नाव तमिझगम असायला हवे असे देखील म्हटले. तसेच भाषणात त्यांनी पेरियार, डॉ. आंबेडकर, के. कामराज, करुनानिधी, अन्नादुराई यांच्या नावांचा देखील उल्लेख टाळला. त्यामुळे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी राज्यपालांच्या या अभिभाषणावर आक्षेप घेतला. त्यावेळी सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी देखील राज्यपालांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्टॅलिन यांनी राज्यपालांचे अभिभाषण सदनाच्या रेकॉर्डवर घेण्याएवजी सरकारने दिलेले भाषणच रेकॉर्डवर घ्यावे असा ठराव मांडला. तो ठराव बहुमताने मंजूर देखील झाला.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी