34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
HomeराजकीयMaharashtra Politics : भाजप नेता म्हणतो, निवडणुका जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ करावे...

Maharashtra Politics : भाजप नेता म्हणतो, निवडणुका जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ करावे…

राज्यातील सत्तांतरानंतर सगळ्याच पक्षांमध्ये थोड्या कुरबूरी सुरू झाल्या आहे. केवळ विरोधी गटातच नव्हे तर सत्ताधारी भाजपच्या गोटातील वातावरण सुद्धा वेगवेगळ्या कारणांनी सध्या ढवळून निघत आहे. भाजप खासदार गिरीश बापट यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी त्यांची नाराजी बोलून दाखवली.आता निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. त्याबाबत कोणीतरी बोलायलाच हवे. भाजपलाही सत्ता हवी आहे. हा निवडून येऊ शकत नाही. दुसरा निवडून येऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सत्तेची राजकीय गणिते जुळविली जात आहेत असे सत्तांतरावर बोलत बापट यांनी भाजपला घरचा आहेर दिला आहे.

यावेळी बोलताना गिरीश बापट म्हणाले, सत्तेची गणिते जुळविण्यासाठी पक्षनिष्ठा, वैचारिक बैठक बासनात गुंडाळली जात आहे. सत्ता प्राप्तीसाठी कोणालाही पक्ष प्रवेश दिला जातो. भाजपही सत्तेची गणिते जुळवित आहे. त्यामुळे निकषही बदलले आहे. पक्षाची बांधिलकी असलेले सच्चे कार्यकर्ते राहिलेले नाहीत. या सर्व प्रकाराबाबत मी नाराज आहे, असे म्हणून त्यांनी नाराजी दर्शवली. पुढे बापट म्हणतात, राजकरण म्हणजे सत्ता किंवा सत्तेची पदे मिळविणे एवढे ध्येय आता कार्यकर्त्यांचे राहिले आहे. गोर – गरीब लोकांची लहान-मोठी कामे करून त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे समाधान पाहणे महत्त्वाचे आहे, असे म्हणून त्यांनी यावेळी नेमकं राजकारण काय असतं यावर प्रकाश टाकला आहे.

हे सुद्धा वाचा…

Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री शिंदे यांना गणेशोत्सवानंतर पितरं सुद्धा अटेंड करावी’

Congress: काँग्रेसचा प्रकाश आंबेडकरांना धक्का!‍

VIDEO : IAS अधिकाऱ्याच्या घरचा पर्यावरणपूरक देखणा गणपती !

आता प्रत्येकाला नगरसेवक, आमदार, मंत्री आणि खासदार व्हायचे आहे. कार्यकर्त्यांमध्ये तशी चढोओढ लागली आहे. कार्यकर्ता हा पक्षाचा आत्मा असतो. कार्यकर्ता नसेल तर पक्ष कसा उभा राहिले. मात्र आता कार्यकर्ते पैसे घेऊन जमा करावे लागतात. जेवणावळी घालावी लागतात. राजकारणाचा स्तर खालावला आहे. वैचारिक बांधिलकी कार्यकर्त्यांकडे नाही. नेत्यांचे, मंत्र्यांचे लांगुनचालन करणे, हार-तुरे देताना छायाचित्रे काढणे, फलक लावणे यात कार्यकर्त्यांना धन्यता वाटत आहे. ही बाब माझ्यासारख्याला पटत नाही, असे म्हणून गिरीष बापट यांनी यावेळी भाजपवरच निशाणा साधला आहे.

गिरीश बापट म्हणतात, कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याने किमान दहा वर्षे पक्ष संघटनेत काम केल्याशिवाय त्याला कोणतेही पद देण्यात येऊ नये. ही कृती सर्वच पक्षांनी केली तर राजकारणातील स्तर टिकून राहिले. आत्ता निवडणूक जिंकण्यासाठी दारूड्यालाही जवळ केले जाते. ही प्रवृत्ती माझ्या सारख्या जुन्या कार्यकर्त्यांना सहन होत नाही. . पूर्वी निवडणुकीतील अनामत रक्कमही जप्त झाली तरी चालत होते. आता सत्तेसाठी कोणालाही पक्षात घेतले जाते. त्यामुळे निकषही बदललेले आहेत. हा सर्व प्रकार व्यथित करणारा आहे, असे म्हणून बापट यांनी निराशेचा सूर आळवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी