25 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरराजकीय'धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा'; 'यळकोट यळकोट, जय मल्हार...'

‘धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा’; ‘यळकोट यळकोट, जय मल्हार…’

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाज सरकारकडे आरक्षणासाठी मागणी करत आहेत. मात्र आरक्षणाची मागणी करणाऱ्या समाजाने सरकार कोणतेही पाऊल उचलत नसल्याचा दावा केला आहे. अनेक वर्षानुवर्षे आरक्षणाचा तिढा कधी सुटेल याबाबत अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. मात्र ओबीसी समाजाने विरोध केला आहे. यासाठी ओबीसी (OBC) समाजाने आता ओबीसी एल्गार महासभा अंबड तालुक्यात आयोजित केली आहे. तर दुसऱ्या बाजूला अनेक वर्षांपासून धनगर बांधव सरकारकडे आरक्षणासाठी मागणी करत आहे. यावर आता भाजप नेते गोपिचंद पडळकर(Gopichand padalkar) आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) बरसले आहेत.

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवे आहे. तर दुसरीकडे धनगर समाज एसटी प्रवर्गातून आरक्षणाची मागणी करत आहे. मात्र एसटी प्रवर्गातील समाज बांधव धनगर समाजाला आरक्षणासाठी विरोध करत आहेत. मराठा समाजाची जी परिस्थिती आहे तिच परिस्थिती धनगर समाजाची पाहायला मिळत आहे. यावरून भाजप नेते गोपिचंद पडळकरांनी मुख्यंमत्री एकनाथ शिंदेंना ‘धनगरांच्या आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा’, असे खडे बोल सुनावले आहे.

हे ही वाचा

विराट कोहली इंस्टाग्राम पोस्टसाठी अक्षय कुमारहून घेतो अधिक पैसे?

जालना जिल्ह्यात ‘ओबीसी एल्गार महासभा’ ‘या’ नेत्याने पोस्टर शेअर करत दिली माहीती

‘मनोज जरांगेंच्या मागून कोणी तरी बोलतंय’?

विशिष्ट समाजाची मदत

माननीय एकनाथ शिंदे आपण राज्याचे मुख्यमंत्री आहात. तरीही आपल्याला राजधर्माची आठवण करून देण्याची वेळ माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर आली आहे. आपण मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असताना सर्वांसाठी नेतृत्व करणार असल्याची प्रतिज्ञा केली होती. धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणीच्या बाबतीत शासनाने ५० दिवसांची वेळ दिली होती. ही मुदत संपली आहे. मात्र अजूनही यावर कोणतेही पाऊल उचलले नाही. फक्त विशिष्ट समाजाची मदत करण्याची धारणा असल्याची भावना बहुजन समाजाची असल्याचे पडळकर म्हणाले आहेत.

धनगर समाजावर अन्याय

धनगर समाजावर आतापर्यंत मोठ्या प्रमाात अन्याय केला. एकनाथ शिंदे यांच्या महायुती असलेल्या सरकारच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेल, अशी धनगर समाजाची आशा होती. आघाडी सरकारने आरक्षण नाकारले, परंतु आपण याबाबतील ठोस भूमिका घ्याल असे वाटले मात्र धनगर समाजाच्या पदरी निराशा आली आहे. धनगर समाजाच्या बाबतीत काही योजना सुरू होत्या त्या योजनाही बंद असल्याचे पडळकर म्हणाले आहेत. याबाबत त्यांनी ट्वीट करत सरकारला धारेवर धरले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी