24 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरमहाराष्ट्र'नातवाला, पुतण्याला साखर कारखाणे दिले आणि मराठ्यांच्या हातात कोयते'

‘नातवाला, पुतण्याला साखर कारखाणे दिले आणि मराठ्यांच्या हातात कोयते’

राज्यात अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणावरून वाद सुरू आहे. मराठा समाज आरक्षणासाठी आंदोलन, उपोषण करत आहे. अशातच आता ओबीसी समाजानेही मराठा समाजाला ओबीसी (OBC) प्रवर्गात समावून न घेण्यासाठी मनोज जरांगे-पाटील यांच्या अंबड बालेकिल्ल्यात महाएल्गार सभा घेतली. ही सभा अंतरवाली सराटीपासून (Antarwali sarati) २० किमीच्या अंतरावर होती. या सभेत अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांनी (Chhagan Bhujbal) जरांगेंवर टीकेचे (Manoj jarange-patil) बाण सोडले आहेत. यानंतर आता भाजप नेते गोपीचंद पडळकरांनी (Gopichand Padalkar) नाव न घेता राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांवर (Sharad Pawar) टीकेचे बॉम्ब फोडले आहेत. राज्यातील नेते शरद पवारांवर बोलताना विचार करून बोलतात. मात्र पडळकर हे शरद पवारांना कोणत्याच सभेत सोडत नाही. महाएल्गार सभेतही तेच पाहायला मिळाले आहे.

गोपिचंद पडळकरांनी शरद पवारांचे नाव न घेता हल्ला चढवला आहे. आपल्या नातवाला, पुतण्याला साखर कारखाने दिले आणि मराठ्यांच्या हातात कोयते दिले असल्याचा पडळकरांचा दावा आहे. त्यांची पोरं जर तुमच्यातडे जर नोकरी मागायला आली तर त्या संस्था चालकांनी ४०-४० लाख रूपये त्याच्याकडे मागितले. तुम्ही या गरीब मराठा समाजावर अन्याय केला आहे. शरद पवारांचे नाव न घेता पडळकरांनी टीका केली आहे.

हे ही वाचा 

‘मनोज जरांगेंना रोहित पवार आणि राजेश टोपेंनी बसवलं’?

‘माझं बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका’; मराठा आरक्षणासाठी नववीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या

‘धनगरांच्या आंदोलनाला सामोरं जाण्याची तयारी ठेवा’; ‘यळकोट यळकोट, जय मल्हार…’

मराठा समाजाची वाताहत कोणी केली? वडेट्टीवारांनी केली, आम्ही केली, भुजबळांनी, जाणकरांनी केली. मराठा समाजाचा नेमका शत्रू कोण आहोत, आपण नाही आहोत. ओबीसी तुमचा शत्रू नाही तुमचा नेमका शत्रू ओळखा, असे आवाहन पडळकरांनी मराठा समाजाला केले आहे.

‘धनगर समाज ठाम उभा’

ओबीसी स्वत:च आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी माहाराष्ट्रातील ओबीसींनी एकत्र यायचं आहे. या महाराष्ट्रातील ५ कोटी धनगर समाज आपल्या मागे ठामपणे उभा आहे. यासाठी आता घाबरण्याचे कोणतेही कारण नाही.

‘धक्का न लागता आरक्षण द्या’

देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीने आरक्षण दिले होते. अगदी त्या पद्धतीने ओबीसी समाजातील आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळावे. ओबीसी समाजातील ३४६ जातींच्या आरक्षणाला हात लावता कमा नये, असे गोपिचंद पडळकर म्हणाले आहेत.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी