28 C
Mumbai
Friday, August 5, 2022
घरराजकीय'यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा...', पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

‘यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा…’, पडळकरांचा नेमका रोख कोणाकडे?

टीम लय भारी 

सांगली : राज्यात महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि भाजप नेते, प्रवक्ते यांच्यासाठी रान मोकळे झाले. अनेक विषयांवर आता टीका टिपण्णी, आरोप – प्रत्यारोपांचे खेळ सहजपणे पाहायला मिळू लागले आहेत. भाजप नेते गोपिचंद पडळकरांनी सुद्धा गरम तव्यावर पोळी भाजणे पसंत केले असून महाविकास आघाडीच्या कामांचा लेखाजोखाच मांडत त्यांची कानउघडणी केली आहे.

भाजप नेते गोपिचंद पडळकर यांनी सोशल मिडीयावर पोस्ट करत महाविकास आघाडीला चांगलेच धारेवर धरले आहे. आपल्या भाषणाची एक व्हिडिओ क्लीप जोडून त्यांनी अधिक स्पष्टपणे आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

सोशल मिडीयावर गोपीचंद पडळकर लिहितात, “@Dev_Fadnavis साहेबांच्या संकल्पनेतून राज्यात विविध ठिकाणी साठ स्मारक व सभागृहांना परवानग्या मिळाल्या व त्यातील ४२ स्मारकांचं काम पुर्ण झालं पण हे आघाडी सरकार आल्यानंतर 18 स्मारकांचं काम यांनी थांबवलं” असे म्हणून विकासकामांवर बोलणाऱ्या मविआ सरकारचा त्यांच्याच भाषेत त्यांनी उत्तर दिले आहे.

पुढे पडळकर म्हणतात,  कारण यांचा दाखवायचा आणि करायचा चेहरा वेगळा आहे असे म्हणून त्यांनी नव्या सरकारचे कौतुक करून महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

हे सुद्धा वाचा

अडचणीत सापडलेल्या ग्लोबल टीचर डिसले गुरुजींना शिंदे – फडणवीस सरकारचा आधार

धनंजय मुंडे यांच्या मागणीला मोठे यश; दोन्ही उड्डाणपुलांच्या चौपदरीकरण कामासाठी निधी मंजूर

मोठी बातमी : देवेंद्र फडणविसांच्या मर्जीतील आमदाराचा सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला, मंत्रीपदाचे स्वप्न भंगण्याची चिन्हे !

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!